WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

कहाणीमागची कहाणी— माझा मऱ्हाटाचि बोल कौतुके । परि अमृतातेही पैजा जिंके ॥

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699याेग्य दरात याेग्य स्थितीतील , पूर्ण चालू कंडीशनमधील अटाेमँटीक वाँशिग मशीन विकणे आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा- 8380099974

प्राकृत भाषेला मराठीचे कोंदण देत ज्ञानेश्वर माऊलीने आमच्या साहित्यसंस्कारांचे बीज रोवले. मागील दहा शतकांत या साहित्य वेलीवर अनेक मनमोहक पुष्पे उमलली. त्यातील काही फुले आजही तितकीच ताजी टवटवीत आणि सुवासिक वाटतात. आमच्या चौफेर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जीवनातील विविध रस या साहित्यशिल्पांतून भेटत असतात. त्यापैंकीच एक म्हणजे गो.नि . दांडेकर तथा गोनिदा तथा आप्पा यांच्या समर्थ लेखणीतून साकारलेल्या अनेक अविस्मरणीय साहित्यकृती !

माझ्याकडील पुस्तकांच्या संग्रहात विविध कप्पे आहेत. त्यातील एक कप्पा गोनिदांच्या साहित्यकृतीनी भरलेला आहे. शितू , पडघवली , पवनेकाठचा धोंडी , मृण्मयी , जैत रे जैत या व इतर एकापेक्षा एक सरस कांदबरी मानवी जीवनाचा ठाव घेतात.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सोबतीने गडकिल्ले पालथे घालत त्यांनी शिवकाल पुनश्च एकदा जगला. पण गोनिदांचा वावर एवढ्यापुरताच मर्यादित नव्हता. विदर्भातला जन्म, वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी घराबाहेर पडत जगाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न , गाडगेबाबांच्या समवे चार वर्षात किर्तन प्रवचन करीत महाराष्ट्राचा कानाकोपरा शोधला … या साऱ्या धावपळीत औपचारिक शिक्षण घ्यायचे राहून गेलं ही गोनिदांची सुरुवातीचा संघर्षाचा काळ. परंतु या भटकंतीत संत वाडःमय आणि लोक साहित्यांचे संस्कार त्यांच्या संवेदनशील मनात खोलवर रुजले. त्यातून उदरनिर्वाहासाठी लेखनाचा मार्ग स्विकारताना गोनिदांच्या या संवेदनशील विचारांतून अनेक साहित्यकृती निर्माण झाल्या. या कथा कादंबरीनी मराठी वाचकांवर मोठं गारुड टाकलं आहे. त्यातील पात्र , त्यांच्या तोंडची साधी सरळ भाषा आणि आजूबाजूचा परिसर तिथल्या निसर्गासह रेखाटताना साऱ्या घडामोडी आपल्याच आजूबाजूला घडत असल्याची अनुभती यायला लागते. हेच गोनिदांचे शब्द सामर्थ्य आहे.

 

कोणतीही साहित्यकृती वाचत असताना त्यातील शब्द , भाव आणि भावना वाचकाच्या मनाभोवती पिंगा घालत असतात. कथा – कादंबरीचा शेवट काय असेल याची उत्सुकताही मनांत नकळत निर्माण होत असते. पण त्याही आधी ही साहित्यकृती जन्माला येण्यापूर्वीच्या लेखकाच्या मनांतील वादळवारे समजून घेता आली तर किती मजा वाटेल ना ? गोनिदांच्या साहित्यकृतीच्या जन्मकथा ‘ कहाणीमागची कहाणी ‘ या त्यांच्या मनोगतातून कागदावर उतरल्या आहेत. सध्या मी हेच पुस्तक वाचत आहे.

आपल्या कथा कादंबरीतील पात्रं कशी भेटली किंवा त्यांच्या तोंडची आपलीशी वाटणारी भाषा, त्यातील स्थानिक बोलीचालीतील बारकावे समजून घेण्यासाठीचा खटाटोप आपली उत्सुकता वाढविणारा असतो. आपल्या कादंबरीतील शितू , अंबू वहिनी , मनू , चिंधी या स्त्री व्यक्तीचित्रांचे रेखाटन करताना अचानक समोर आलेले प्रसंग कारणीभूत झाले. ब्राम्हण युवकाच्या प्रेमात पडलेली तेल्याची शितू आणि तिची असफल प्रेम कहाणी कोकणांत गावी गेल्यावर काकांशी बोलतांना सापडली. तर राजमाचीच्या परिसरात फिरताना तिथल्या ठाकरांची ओळख वाढल्यावर जैत रे जैत ची गोष्ट आणि त्यातील नाग्या , चिंधी , म्हातारा भगत ढोलिया सापडले.

गोनिदांनी ज्ञानदेव आणि राजा शिवछत्रपती यांना दैवत मानले होते. ज्ञानदेवांच्या जीवनाची मोगरा फुलला ही कहाणी लिहण्यासाठी आळंदीला अडीच वर्ष माधुकरी मागून सारा परिसर धुंडाळला. तत्कालीन वाङमयाचा अभ्यास करुन काही पात्रे नव्याने शोधत विठ्ठलपंतांच्या मृत्यूचा विरह उमजून घेण्यासाठी जणू त्यांना झपाटले होते. ज्ञानदेवाच्या ज्ञानेश्वरीने त्यांना जीवनाचा प्रवास समजावून सांगितला. त्यामुळेच हे ऋण फेडण्यासाठी मी झपाटलो होतो असे गोनिदा म्हणतात.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी गोनिदांकडून शिवकाल चित्रित करण्याचे वचन घेतले होते. त्यासाठी त्यांनी होती नव्हती ती सारी ओझंभर ऐतिहासिक दाखल्यांची पुस्तके वाचून काढली. त्यांत कल्पनेची थोडी भर घालत त्या काळातील वाड्या वस्त्या , शेती , खून खराबी , युद्ध , लग्न समारंभ याबाबत शिवकाल उभा केला. अनेक ऐतिहासिक पात्रांसोबत राणोजी , बाजी , सुभानराव अशी व्यक्तीचित्रे कल्पनेतून निर्मिली. या व्यक्तीचित्रणाला भौगोलिक व नैसर्गिक वैशिष्ठांची जोड होती. अर्थात ही माहिती केवळ कल्पना विलास असू नये , तर त्याला सत्यतेचे अधिष्ठान असावे यासाठी त्यांनी खातरजमेला प्राधान्य दिले. आपल्या कादंबरीत खाडीच्या उतारावरून रेवदंड्याच्या पोर्तुगुजांनी बांधलेल्या गढीचे तट बुरुज दिसतात यासाठी पुनः पुनः तेथील सारा न्याहळत त्याची त्यांनी खात्री करून घेतली. असेच काही त्यांच्या पात्रांच्या तोंडच्या बोली भाषेबद्दल पण सांगता येईल.

मितेश घट्टे
अपर पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण

गोनिदांच्या साहित्यकृतीतून भेटलेली पात्रांच्या आयुष्यातील वेदना आणि स्वप्नं आजपण आजूबाजूला वावरणाऱ्या गर्दीत पहायला मिळतात. तेव्हा आपणपण नकळत त्यापैकीच एक पात्र झाल्याचा भास होतो. त्यामुळे गोनिदांच्या पुस्तकांचे वाचन करताना त्यांच्या स्वभावगुणांचा आणि कल्पना शक्तीचा शोध समजून घेण्याचा मोह आवरत नाही. सुदैवाने गोनिदांचे पुतणे डॉ. राजा दांडेकर आणि नात ( प्रसिद्ध अभिनेत्री ) मृणाल कुलकर्णी – देव यांचेशी आमच्या कुटुंबियांचा अकृत्रिम स्नेह जुळला आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीवेळी गोनिदांच्या सान्निध्यात असल्याचा एक अदृश्य आनंद नेहमी होत असतो.

गोनिदांची बेचाळीस वर्षांची लेखन तपस्या समजून घेताना मला त्यांचेबद्दल व्यक्त होणे अंमळ टाळता आले नाही. त्यांचे स्मरण निश्चितच आम्हांला आमचा इतिहास , संस्कृती आणि समाज याबाबत जिव्हाळा निर्माण करणारे आहे.

विशेष साैजन्य.. आणखी बरेच काही वाचण्यासारखे.. लिंकवर क्लिक करा!

सामाजिक संस्काराचे बीज रूजवावेच लागेल …

होळी म्हटलं की, बोंबलायचा सण एवढचं लहानपणी आम्हांस ठाऊक होतं… मात्र !

सलाम या कार्यकर्तृत्वाला! करून दाखविले! सलग चाळीस तास कडा पहारा; एकमेकांच्या समन्वयातून आव्हानाचे शिवधनुष्य पेलले…

 

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी