WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

सलाम या कार्यकर्तृत्वाला! करून दाखविले! सलग चाळीस तास कडा पहारा; एकमेकांच्या समन्वयातून आव्हानाचे शिवधनुष्य पेलले…

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

नववर्षाची पूर्वसंध्या पुणे पोलिसांसह महाराष्ट्र पोलिसांच्या सहनशक्तीचा कस पाहणारा ठरते. कोरोना काळाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर एकीकडे सारेच सण, उत्सव गर्दीत, जल्लोषात साजरे होत असल्याने पोलिसांच्या जबाबादारीत आणखी वाढ झाली. कायदा व सुव्यवस्था या दोन शब्दांना अजिबात धक्का लागू नये म्हणून कर्तव्य बजावताना पोलिसांची कसोटी लागते. भिमा-कोरेगांव येथील शौर्य दिनाचा बंदोबस्ताचे नियोजन पार पाडताना प्रत्येक पोलीस कर्मचारी ते वरिष्ठ अधिकारी यांनी बजावलेली भुमिका हे नेटक्या नियोजनाचे उदाहरणच…! अभूतपुर्व गर्दीत शौर्यदिन पार पाडताना पोलिसांनी कर्तव्याला जागून सलग ४० तासांपेक्षा जास्त जे कष्ट घेतले ते ‘कायदा व सुव्यवस्था’ या दोन शब्दांना अबाधित ठेवून गेले. ३१ डिसेंबरपर्यंत वाटणारे आव्हान एकमेकांच्या समन्वयातून १ जानेवारीच्या रात्री एका अनुभवात बदलून गेले.

तणावाच्या घटना टाळण्यासाठी दि. १ जानेवारीला बंदोबस्त, हजारो वाहनांच्या पार्कींगचे नियोजन, लाखो अनुयायांच्या येण्या जाण्याच्या मार्गाची व्यवस्था, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून डोळ्यात तेल घालून रात्रंदिवसचा खडा पहारा याचा अनुभव पोलीस दलात कर्मचारी ते वरिष्ठातील वरिष्ठ अधिकारी घेत आहेत. यंदा मात्र अलोट गर्दीचा अंदाज घेऊन पुणे पोलीस दलाने नियोजनाचा आराखडा तयार केला. कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडांनंतर शौर्यदिनाला अनुयायांची प्रचंड गर्दी होणार हे गृहीत होते.

तत्कालीन विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील, सुहास वारके, मनोज लोहिया, पुण्याचे तात्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील, डॉ. अभिनव देशमुख तसेच डॉ. संदीप पखाले व मिलिंद मोहिते यांनी त्यांच्या कार्यकाळात बंदोस्ताचा आराखडा, व्युहरचना आखताना प्रचंड बारकावे टिपत एक नवा पॅटर्न विकसित केला आहे. त्या धर्तीवरच यंदा वाढणारी गर्दी लक्षात घेऊन पुणे पोलीस दलाचे नियोजन सुरू होते. केवळ अधिकारीच नव्हे तर प्रत्येक पोलीस कर्मचारी याच्या अनुभवाच्या चर्चेतून समन्वय साधत आराखडा कागदावर उतरवला जात होता.

‘विजयस्तंभ’ नव्याने पुणे शहर हद्दीत येत असला तरी आजुबाजूचा सारा परिसर पुणे ग्रामीण हद्दीत येत असल्याने बंदोबस्तासह सर्व नियोजनात पुणे ग्रामीण पोलीसांचा बरोबरीने सहभाग आहे.

यावेळी दुपटीने गर्दी होणार हे लक्षात घेऊन २७ डिसेंबर २०२२ पासून उभ्या महाराष्ट्रातूून तब्बल चार हजार पोलीस अधिकारी व अंमलदार या परिसरात बंदोबस्ताला रुजू होण्यासाठी येत होते. आपल्याला नेमून दिलेल्या ठिकाणी कर्तव्य बजावताना ते थोडे पण थकत नव्हते. पोलीस म्हणून जी शपथ घेतली आहे त्यातील प्रत्येक शब्द ह्रदयात जागा ठेवून पोलीस कर्तव्याच्या ठिकाणी उभा दिसत होता…कुचराई नाही की ताण आला तरी तो दाखवला जात नाही हेच पोलिसांचे खरे रूप अनेकांच्यात पहायला मिळाले…मोठ्या पोलीस फौजफाट्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

‘सनी’ …समाजातील कटू वास्तव पहायचे तर ‘सनी’ पहा!

गर्दी वाढत होती तसे नियोजनातील प्रत्येक प्लॅनची अंमलबजावणी वेगाने केली जात होती. त्यासाठी प्रत्येक पोलीस अधिकारी कायम अलर्ट मोडवर होते… वाहनांच्या गर्दीचा अंदाज घेऊन आम्ही तब्बल आठ ठिकाणी पार्कींग व्यवस्था केली होती. या व्यवस्थेवर लक्ष ठेवून घाईगोंधळ होणार नाही याची जबाबदारी प्रत्येक अपर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकारी यांच्यावर सोपवली होती. मराठवाडा विर्दभाकडून येणारे अनुयायांसाठी शिक्रापूर हद्दीत तोरणा पार्कींग तयार केले होते. वाढत चाललेल्या अनुयायांच्या वाहनांचा अंदाज घेऊन पोलीस व्युहरचनेनुसार जीत ढाबा पार्कींग व्यवस्था नव्याने केली होती. केवळ पार्कींगच नव्हे तर पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा, सार्वजनिक स्वच्छतागृहाची व्यवस्था पुरविण्यासाठी शासनाचे विविध विभाग गुंतले होते.

बंदोबस्तासह सर्वच व्यवस्थेत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सर आणि पोलीस अधीक्षक अंकीत गोयल सर यांनी प्रत्येक ठिकाणाचे स्वतः पर्यवेक्षण सुरू ठेवले होते. जिथे बदल करावा वाटेल तिथे ते ताबडतोब सुचना देत वेगवान कार्यवाहीला प्रोत्साहीत करत होते.

अनुयायांनी वाहने पार्कींग केल्यावर त्यांना पेरणे फाटा येथील विजयस्तंभाकडे जाण्यासाठी PMPL ची मोफत बस सुविधा उपलब्ध करून दिली होती.

डेंजर्सः..बापरे, उलटीतून तब्बल साडेतीन काेटी! पाेलीस पण सव्वाशेर निघाले, काय प्रकार ताे पहा सविस्तर

शिरुरचे पोलीस उपाधिक्षक यशवंत गवारी व शिक्रापूरचे पोलीस निरिक्षक हेमंत शेडगे यांनी आपल्या स्थानिक जबाबदारीचे भान ठेवत सारी पुर्वतयारी केली. त्यासाठी २४ तासात त्यांचे पाय मिनिटभरासाठी सुद्धा थांबले नाहीत. दिवसा दुपारनंतर उन्हाचा तडाखा तर मध्यरात्रीनंतर थंडीचा कडाका…या वातावरणात बंदोबस्तावरील पोलिसांना आवश्यक सुविधा पुरवणे गरजेचे होते. पोलिसांंना थंडीपासून बचावासाठी हुडी पुरवणे, चहा देणे यासाठी पहाटेपर्यंत आम्ही स्थानिक अधिकारी व्यस्त होतो.

खरेे आव्हान १ जानेवारीचे होते…ते पेलण्यासाठी आम्ही सज्ज होतोच…पण मध्यरात्रीपासून अनुयायांचा ओघ वाढत गेल्यावर आमच्या धावपळीचा, फोनाफोनीचा, वायरलेस मेसेजचा वेग आणखी वाढला. अनुयायांच्या वाहनांची संख्या एवढी वाढली की रविवारी सकाळी भले मोठे तोरणा पार्कींग तब्बल ८०% पेक्षा जास्त भरले होते. त्याचा अंदाज घेत नव्याने तयार ठेवलेले जीत ढाब्या समोरचे पार्कींग सुरू करण्याची वेळ येऊन ठेपली. एसपी गोयल सरांचे लक्ष प्रत्येक हालचालीवर असल्याने त्यांनी तातडीने जीत पार्कींग सुरू करण्याचे आदेश दिले. एसपी सरांचा आदेश येताच मी डिवायएसपी गवारी आणि बंदोबस्ताला आलेल्या तासगांवच्या डिवायएसपी अश्विनी शेंडगे यांच्या मदतीने अवघ्या १५ मिनिटात जीत ढाब्या समोरचे पार्कींग सुरू करत वाहतूक कोंडी फोडली.

रस्त्यावर अनुयायांची गर्दी होत होती मात्र वाहने रस्त्यात उभा राहिल्याने वाहतूक कोंडीत भर पडून खेचाखेची होण्याची शक्यता होती. ही शक्यता गृहीत धरून सोलापुरचे अपर अधिक्षक हिंमत जाधव यांनी रात्रभर रस्त्यावर खडा पहारा देत रस्त्यावर वाहने उभी न होता ती थेट पार्कींगस्थळी जातील यासाठी लक्षवेधी कष्ट घेतले.

पार्कींग स्थळापासून विजयस्तंभाकडे अनुयायी जाताना समतोल राखला जावा यावर सातारचे अपर पोलीस अधिक्षक बापू बांगर हे प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. अनुयायांची संख्या अमर्याद वाढताना पोलिसांनीही आपल्या समन्वयात चांगलीच सजगता ठेवली होती. त्यामुळे चाकण चौकात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पंढरपूरचे डिवायएसपी विक्रम कदम यांनी आपले कसब पणाला लावत कोंडी फोडण्याचा प्रयत्न सतत सुरू ठेवला होता.

वढू बुद्रुक येथील जबाबदारी ठाण्याच्या अपर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली धाटे, डिवायएसपी राहूल धस, गणेश इंगळे, कृष्णात पिंगळे यांच्यावर होती. डॉ. धाटे यांच्यासह वरिल अधिकारी टिमने एकजुठीने छत्रपती शंभूराजे आणि गोविंदबाळा गायकवाड यांच्या समाधीस्थळी देखरेख कायम ठेवली होती. त्यांनी आपल्या पोलिसींगचे कौशल्य दाखवून दिले. ते दखलपात्र होते.

अनुयायी विजय स्तंभाला अभिवादन करुन पार्किंगकडे परतत असताना त्यांना गर्दीतून वाट काढताना कसरत करावी लागत होती. हा हजारोंचा जनसमुदाय आवरत त्यांनी शिस्तीत बसमधे बसण्याच्या व्यवस्थेत बारामतीचे अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे यांच्यासह डिवायएसपी डॉ. सुदर्शन पाटील, विशाल हिरे, मंदार जवळे यांचीही प्रत्येक क्षणाला कसरत झाली. कितीही दमछाक झाली तरी या टिमने एक क्षण सुद्धा इकडे तिकडे केले नाही. वाढलेली गर्दी आणि बसची संख्या यांचा मेळ घालताना अनुयायांशी संवाद साधून त्यांना प्रत्येकाला बस मिळेल काळजी करू नका हे प्रसंगावधान साधणे त्या क्षणी गरजेचे होते. जनसमुदायाच्या भावना अनावर होऊ नये म्हणून हे प्रसंगावधान राखत आनंद भोईटे स्वतः वॉच टॉवर गेले. तेथून त्यांनी निवेदकाच्या भुमिकेत जनसमुदायाशी संवाद सुरू केला. माईक हातात घेऊन त्यांनी जिवाच्या आकांताने जनसमुदायाला योग्य सुचना करत मार्गदर्शन केले.

फिल्डवर प्रत्येक अधिकारी कष्ट घेत असताना दुसरीकडे पोलीस निरिक्षक सुंभे यांनी सीसीटीव्ही कॅमेरे व ध्वनी व्यवस्थेवरून जराही लक्ष हटवले नाही. प्रेमदीप माने यांनी वाहतूक व्यवस्था कशी चोख राहिल यावर लक्ष केंद्रित केले होते.

विशेष उल्लेख करण्यासारखी बाब म्हणजे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख सर यांनी प्रशासन आणि पोलीस यांचा समन्वय कसा राहिल यासाठी कुटूंबप्रमुखाची जबाबदारी पार पाडली. ते स्वतः पोलीस कंट्रोल रूममधे ठाण मांडून बसले होते. सीसीटीव्ही मॉनेटरिंग करत सुचना देण्यात ते व्यस्त होते. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचा समन्वय यातून दिसला.

सदरक्षणाय… खलनिग्रहणाय हे ब्रिदवाक्य कर्तव्यदक्ष पोलिसांच्या रक्तात भिनलेले असते. या कर्तव्याला समाजाची जोड मिळाल्यास एक नवा आदर्श निर्माण होतो. शिक्रापूर आणि सणसवाडी या भागातील हॉटेल, व्यावसायिक, मंगलकार्यालये, खासगी कंपन्यांनी सौजन्य दाखवत निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यास पुढाकार घेतला. साहजिकच हे सौजन्य एवढ्या मोठ्या पोलीस फौजफाट्यासाठी आपुलकीचे ठरले.

एकूणच कोरोनाच्या काळानंतर भिमा-कोरेगावला यंदा अभूतपुर्व जनसमुदाय लोटला. त्या जनसमुदायाच्या भावनांचा आदर करत त्यांची गैरसोय होणार नाही हा प्रयत्न पुणे जिल्हा प्रशासन व पुणे पोलीस दलाने केला. यात राज्यातून आलेल्या पोलिसांची भुमिका अत्यंत संवेदनशील ठरली. गत वर्षी मी पाहुणा म्हणून नियोजनाच्या आराखड्यात होतो. नव्याने तयार झालेला शिरूर विभाग माझ्याकडे असल्याने यावेळी मी यजमानाच्या भुमिकेत होतो. दडपण असले तरी एसपी अंकीत गोयल सरांच्या मार्गदर्शनाखाली चोख,नेटक्या, नियोजनबद्ध बंदोबस्ताचे शिवधनुष्य एकमेकांच्या समन्वयाने पेलले…पोलिसांच्या वाट्याला येणारा प्रत्येक दिवस एक नवे आव्हान घेऊन येतो…पण येणारे प्रत्येक आव्हान नवा अनुभव देऊन जाते…

३१ डिसेंबरपुर्वी मलाही हे आव्हान वाटले होते , मात्र १ जानेवारीच्या पहाटेपासून जिल्हा प्रशासन व पोलीस दलाने ज्या समन्वयाने कष्ट घेतले…तब्बल ४० तास सलगच्या सहनशिलतेमुळेच हे आव्हानाचे शिवधनुष्य अनुभवात बदलून गेले.

मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण

यात समाधान देणारी बाब म्हणजे वरिष्ठांनी केलेले कौतूक…शिस्तबद्ध पोलीस दलात एखाद्या कामगिरीबद्दल झालेले कौतूक खूप प्रेरणादायी असते. हे कौतूक बंदोबस्तासाठी झटलेल्या प्रत्येक पोलीस अंमलदार आणि अधिकारी यांचे बळ वाढवणारे आहे…

 

 

  शेवटी हा व्हिडीओ पहा… https://youtu.be/mIwvFgrx8LAPOSITIVEWATCH.IN

 

पाेलिसांच्या या मेहनतीला POSITIVVE WATCH  टीमचा सलाम.. जयहिंद

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी