अग्निशमन व आणीबाणी सेवांचे बळकटीकरण (जिल्हास्तर) अंतर्गत खरेदी केलेल्या अग्निशमन वाहनाचे लोकार्पण

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान २०२४- २०२५

कोल्हापूर – इचलकरंजी महानगरपालिके कडून महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान २०२४- २०२५ अग्निशमन व आणीबाणी सेवांचे बळकटीकरण (जिल्हास्तर) अंतर्गत खरेदी केलेल्या आणि इचलकरंजी महानगरपालिका अग्निशमन दलाच्या ताफ्यामध्ये नव्याने दाखल झालेल्या अग्निशमन वाहनाचा लोकार्पण सोहळा खासदार धैर्यशील माने आणि आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते आणि महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर तसेच उपमहापौर अनिल डाळ्या,अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगर पालिका मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात शुक्रवार दिनांक २९ मे रोजी संपन्न झाला.

या नवीन अग्निशमन वाहनाच्या समावेशाने इचलकरंजी महानगरपालिका अग्निशमन विभाग बळकट झाला आहे असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे, शिक्षण समिती सभापती विद्या साळुंखे, प्रभाग समिती सभापती सुशांत कलागते, नगरसेवक राजू बोंद्रे, नगरसेवक अविनाश कांबळे, माजी नगरसेवक दिलीप मुथा, प्रमोद बचाटे यांचेसह उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त विद्या कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखापरीक्षक आरती खोत, सहा आयुक्त सुनिल शिंदे, सहा आयुक्त रामचंद्र कांबळे, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, वाहन अधिक्षक संजय शेटे, आपत्ती व्यवस्थापनाचे संजय कांबळे आदींसह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.