बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारताची भूमिका महत्त्वाची- पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : एनडीटीव्ही वर्ल्ड समिट २०२६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदलती जागतिक व्यवस्था, जागतिक अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताच्या भूमिकेवर भाष्य केले. जुन्या जागतिक व्यवस्थेला आजच्या आव्हानांवर प्रभावी उपाय देता येत नसल्याचे सांगत, नव्या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी सामान्य नागरिक असणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यपद्धतीत बदलत्या जागतिक वास्तवाचे प्रतिबिंब उमटणे गरजेचे असल्याचे मोदी म्हणाले. व्यापाराचे वाढते शस्त्रीकरण आणि सागरी मार्गांवरील भूराजकीय तणाव यांचा उल्लेख करत त्यांनी भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे महत्त्व स्पष्ट केले. भारत जगातील आघाडीच्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवण्याच्या दिशेने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशांतर्गत राजकारणावर भाष्य करताना मोदी यांनी काँग्रेस आणि तिच्या नेतृत्वावर टीका केली. काँग्रेस नेतृत्वाच्या वारंवार होणाऱ्या राजकीय ‘लाँचिंग’वर त्यांनी उपरोधिक टिप्पणी केली. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी देशाने एकजुटीने पुढे जाण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.