WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

सामाजिक संस्काराचे बीज रूजवावेच लागेल …

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

*संवेदना’ या शब्दाची जाणीव गुन्हेगारी प्रवृत्तीला असतेच असे नाही. किंबहुना गुन्हेगारी प्रवृत्तीला जात , धर्म , भाषा वा प्रांत असा कोणताही शिक्का मारता येत नाही. सामाजिक, मानसिक संवेेदना नष्ट होऊन ‘असंवेदनशील’तेचा कळस गाठणारा एखादा संशयित समोर येतो तेव्हा मनात प्रचंड चिड येते. कायद्याचा आदर रक्तात भिनलेला असल्याने अनेकदा चीड येऊनही स्वतःला सावरत गुन्हेगारी प्रवृत्तीला जरब बसवण्यासाठी आम्ही पोलीस प्रयत्नशील राहतो.

पोलीस तपास करीत असताना समाज मनाचे अनेक कांगोरे समोर येतात. त्यांना सामोरे जाताना काही वेळा मनात निराशेचे काळे ढग दाटून येतात. अशा घटनेने ‘संवेदना’ या शब्दाला पुरते चिरडून टाकत ‘असंवेदनशिल’तेचा कळस गाठल्याची जाणीव करुन देतात. समाजात मुली, स्त्रियांना आजही स्वतःचे आस्तित्व जपण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो याचे उदाहरण म्हणजे अशा घटना तर नव्हेत ना? असा विचार घोळू लागतो.

अत्यंत गोपनीयता बाळगून असा संवेदनशील तपास करावा लागतो. आरोपीने केलेल्या कृत्याचे खरे रूप बाहेर आणताना पिडितेच्या कोमल बाल मनावरचे ओरखडे पुसता येतील का याचेही भान ठेवावे लागते. पिडितेच्या घरातील वा शेजारचा कोणी वडिलधारा इसम कधी प्रेमाच्या नावाखाली तर कधी धाक दाखवून वासनेची भूक शमविण्यासाठी सरसावतो त्यावेळी ती गोष्ट जास्त दिवस लपून राहत नाही. कधी कधी अध्यात्माचा आव आणत तोळामोळा शरीर असणारा जर्जर आपले कृत्य जेव्हा कबूल करतो, तेव्हा एका बाजूला त्याच्याकडे पाहून चीड टोकाला जाते, अन् त्या निरागस मुलीकडे पाहून मनात हळहळीने कमालीचा भावनिक हुंदका येतो. जगाची सोडाच स्वतः च्या शरीराची, मनाचीही ओळख न झालेल्या त्या निष्पाप मुलीवर आलेला प्रसंग समाजाच्या संवेदनेची वीण उसवत चालली आहे का? असा प्रश्न उभा करतो. गर्दीत राहणारी माणसे मनाने स्वतःला एकाकी समजत अपवादात्मकरित्या शारिरिक भूक भागवण्यासाठी सामाजिक संवेदनेचे लचके तोडण्याची मानसिकता घेऊन फिरत असतात हे या घटनेने समोर आणले.

सोशल मिडीया जगरहाटी बनलेला असून तो आता कोणत्या एका समुहापुरता मर्यादीत राहिलेला नाही. तो गावागावात, घराघरात पोहचला आहे. सोशल मिडीयावर व घरा घरात पाहिल्या जाणाऱ्या चित्र मालिकामधून दाखवला जाणारा लैंगिक स्वातंत्र्याचा स्वैराचार हा सुद्धा अशा घटनांना कारणीभूत ठरतोय असे म्हणायला वाव आहे. कारण प्रसार माध्यमातून लैंगिकतेचे आभासी चित्र तयार करून वास्तवाला छेद दिला जातोय आणि नेमके त्याचेच आकर्षण वेगाने वाढत आहे. या आभासी सोशल मिडीयाने अनेकांची मानसिक वृत्ती एका असंवेदनशील प्रवृत्तीत बदलते. यातून दुर्गा म्हणून गौरवली जाणारी, सरस्वती म्हणून पूजली जाणारी स्त्री अनेकदा आस्तित्वासाठी किती संघर्ष करते हा विचार सुन्न करतो. स्त्री-पुरूष समानता नक्कीच आहे पण शहराच्या काही भागात आणि ग्रामीण भागातील वाड्यावस्तीत या समानतेचा वारा अजुनही फिरकलेला नाही असे चित्र डोळ्यासमोर येते. ते वास्तव आहे याची जाणीव अशा घटनांमधूून होते.

समाजात ठराविक मानसिकतेत उरलेली असंवेदनशिलता नष्ट करण्यासाठी सामाजिक संस्कार आणि सामाजिक शिक्षण याची बीजे रूजवावी लागतील. या बीजांचे संगोपन करावे लागेल. जेव्हा ही सामाजिक संस्काराची बीजे बाळसं धरतील तेव्हा त्याचे रूपांतर सुदृढ समाज रचनेच्या व्यापक वृक्षात होईल. हाच सामाजिक संस्काराचा व्यापक वृक्ष समाजातील मुली, स्त्रियांना सुरक्षिततेची सावली देईल.
आपले पोलीस दल यासाठी कायमच प्रयत्नशील आहे. प्रत्येक मुलीला गुड टच…बॅड टच यांसह समाजात नेमके कोण कसे वागते याची जाणीव करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.

मितेश घट्टे
अपर पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण

पोलिसांच्या या प्रयत्नांना खूप वेळा यश येऊन कितीतरी गुन्हे घडण्यापुर्वी त्या प्रवृत्तींना आळा बसला आहे. यापुढेही हे प्रयत्न पोलीस दलाकडून होत राहतील यात शंका नाही.

‘सनी’ …समाजातील कटू वास्तव पहायचे तर ‘सनी’ पहा!

होळी म्हटलं की, बोंबलायचा सण एवढचं लहानपणी आम्हांस ठाऊक होतं… मात्र !

सलाम या कार्यकर्तृत्वाला! करून दाखविले! सलग चाळीस तास कडा पहारा; एकमेकांच्या समन्वयातून आव्हानाचे शिवधनुष्य पेलले…

 

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.