बांबवडे – लव्ह जिहाद’ गोहत्या बंदी व धर्मांतर याबाबत कठोर कायदा करण्यासाठी शाहूवाडी तालुका हिंदू सकल समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. या विराट मोर्चात तालुक्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते त्याचबरोबर महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मलकापूर ते शाहुवाडी या मार्गावरून हा मोर्चा काढण्यात आला .
मलकापूर येथील नरहर मंदिर येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या मोर्चात वेशभुषा ‘ भगव्या टोप्या परीधान केलेले ‘त्याचबरोबर भगवे ध्वज हातात घेऊन असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते तर महिलांचा सहभागही लाक्षणीय होता . लव्ह जिहाद ‘ गोहत्या बंदी व धर्मांतर बंदी याबाबत शासनाने कठोर भूमिका घेऊन कायदा करावा . यासाठी हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्याचं दिसत आहे.
कोल्हापुरात लव्ह जिहाद विरोधात एकवटले हिंदूत्ववादी- जन आक्राेश माेर्चाने शहर दणाणले! !
याच पार्श्वभूमीवर या विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं . मोर्चात घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालय येथे आला . निवासी नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांनी निवेदन स्वीकारले यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले . यावेळी हिंदू एकता आंदोलन सातारचे जिल्हाध्यक्ष व गड किल्ले संवर्धन समन्वय विक्रम पावसकर व तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह भ प शिरीष मोरे यांनी लव जिहाद गोहत्या बंदी धर्मांतर बंदी हे कायदे लवकरात लवकर अमलात आणावेत यासाठी एकीने लढा दिला पाहिजे असे आवहान केले.
मोर्चात लहान मुलांच्या सह युवक युवती महिला वृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.