काेल्हापूर – अनिकेत बिराडे
लव जिहाद, धर्मांतर गोवंश हत्या बंदी कायदा त्वरित व्हावा या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने कोल्हापुरात आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं दुपारी बारा वाजता ऐतिहासिक बिंदू चौकात मंत्पुष्पांजलीने भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आलं यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
बिंदू चौकातील हनुमान मंदिरापासून मोर्चाला प्रारंभ झाला मोर्चाच्या अग्रभागी भवा ध्वज त्यानंतर महिला आणि जिल्ह्यातून आलेले हिंदू बांधव मोर्चात सहभागी झाले, मिरजकर तिकडे बिन खांबी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटी मार्गे जनआक्रोश मोर्चा छत्रपती शिवाजी चौकात आल्यानंतर यावेळी शंभर फूटी डिजिटल फलकाचा अनावरण करण्यात आलं,मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून मोर्चा भवानी मंडप आल्यानंतर मोर्चाचं रूपांतर सभेत झालं, मोर्चाला संबोधित करताना दिल्लीच्या सुदर्शन चॅनलचे सुरेश चव्हाणके यांनी जन आक्रोश मोर्चा बद्दल विवेचन केलं.
भव्य माेर्चाचा व्हिडीओ पहा —– https://youtu.be/42jXM5sQJWM
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात शंभर फुटी डिजिटल फलक उभारण्यात आला. जन आक्रोश मोर्चा छत्रपती शिवाजी चौकात आल्यानंतर या मोर्चाचं अनावरण करण्यात आलं, मोर्चात सामील झालेल्या तरुणांनी आपल्या हातातील मोबाईल मध्ये डिजिटल फलकाचा अनावर होतानाचे चित्रीकरण करण्यासाठी एकच स्पर्धा लागली, मोर्चामध्ये या फलकाची चर्चा दिवसभर सुरू होती.
व्यासपीठावर निळकंठ पाने, बंडादादा साळुंखे, सुधीर जोशी वंदूरकर, शांतिनाथ लिंबानी, शिवानंद स्वामी, अनिरुद्ध कोल्हापुरे, उपस्थित होते तर खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, गायत्री राऊत सहभागी झाले होते. भगव्या टोप्या, हे उपरणे भगवे ध्वज यामुळे अवघे कोल्हापूर भगवमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं, मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिस दलाच्या वतीनं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
राजकीय नेत्यांची झुंबड
हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयाेजन काेल्हापुरात करण्यात आलं होतं. या मोर्चात सर्वपक्षीय राजकीय नेते सहभागी झाले होते, मोर्चाच्या आयोजकांनी मात्र कोणत्याही राजकीय नेत्याला व्यासपीठावर स्थान न देता सकल हिंदू समाजाच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करावा असा आवाहन केलं. मात्र कोल्हापुरातील राजकीय पुढारी आपापले कार्यकर्ते घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झाले.
जयहिंद… जय भारत, जय महाराष्ट्र- POSITIVVE WATCH – एक सकारात्मक विचार