शुभांगी पाटील-चंदगड– VIDEO लिंक पहा
अनेकांनी ३१ डिसेंबरची रात्र सरली. अनेकांनी हा दिवस मद्दधुंदी मग्र होऊन साजरा केला, तर काहींनी फटाक्यांच्या आतषबाजींनी, पार्टी करून, फिरायला जाऊन, मस्ती करून साजरी केली व नव्या पहाटेची वाट पाहिली. काहींनी रात्र जागून काढली. तर काहींनी नव्या वर्षाची सुरुवात ही मंदिरात जाऊन परमेश्वरचरणी नतमस्तक होऊन नव्या विचारांचा नव्या संकल्पाची मुहुर्त मेढ रोवली. खरतर हे आपल्या परंपरेनुसार भारतीय नव वर्ष नसले तरी कित्येक वर्षापासून नववर्ष असेच साजरे केले जात आहे. सध्या हिंदुत्ववादी विचारसरणी पुढे येऊ लागल्याने नववर्षाची व्याख्या काहीही बदलत चालली हे, हे तितकेच खरे. असे असले तरी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र् असल्याने ज्याचा त्याचा कसा दिवस साजरा करायचा, कसा सहभाग घ्यायचा हे ठरलेले आहे.
मात्र, नव्या वर्षाची सुरुवात करताना, आणि जुन्या वर्षाला निरेप देताना आपणही समाजाचा देणं लागतो, याचा विचार करायला हवा.. आपला दिवस आनंदात गेला की झालं.. अस म्हणून चालणार नाही. दुसऱ्या बाजूला आपल्या अवतीभेवती जरा पाहिल पाहिजे. कित्येक गरीब कुटुंबिय त्यांचा आनंद कसा साजरा करत असतात हे थोडंस उघड्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे, आपल्या हातून एकादे चांगले कार्य हेतय का पहायला हवं.
रस्त्याने जाताना थोड निरखून पाहिल तर, झोप़डपट्टी, हातावर असणारे पोट, मोलमजूर करणारे लोक, यांचा प्रत्येक दिवस हा आनंदाचा, मस्तीचाच असतो. त्यांना नव वर्ष केव्हा आल याच्य़ाशी काहीच देणंघेणं नसते. प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण आनंदाने जगण्यासाठीचा असतो. आपण गर्भश्रीमंत असो व सर्वसामान्य प्रत्येकांनी अवतीभोवती आपला समाज कसा सूज्ञ होईल, आर्थिक समानतेजवळ कसा पोहचेल याचा विचार केला पाहिजे, त्या दृष्टीने थोडासा हातभार लावला पाहिजे.. तरच समाजात आनंदाचे, सुख समृद्धीचे वातावरण निर्माण होईल.
हा व्हिडीओ देखिल असाच काहीसा सांगून जातो. आम्हाला ना नव वर्ष… ना सण उत्सव, मोलमजुरी केल्याशिवाय घरात चूल पेटत नाही, कमविल्याशिवाय घरात अन्नधान्य येत नाही, की मुलांच्या अंगावर कपडे लत्ता.. शिक्षण तर दूरच..आज शासनाच्या अनेक योजना आहेत, परंतु, त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहाचताहेत की नाही, याकडे लक्षच दिले जात नाही… त्यामुळे नव्या वर्षाचा प्रत्येकांनीच असाही संकल्प केला पाहिजे, की मी केवळ माझ्यापुरता नसून, माझे कुटुंब, माझा समाज, माझ्या समाजाचा,माझा गाव विकासभिमूख कसा होईल याकडे प्रत्येक तरुणांनी, नव्या पिढीने लक्ष दिले पाहिजे.. आर्थिक स्तर सुधारला तरच समाज व देश प्रगतीपथावर जाईल, असा विश्वास आहे, असाच संकल्प या नव्या वर्षाच्या निमित्ताने प्रत्येकांनी करायला हवा.