राजर्षी शाहुंच्या विचारांचा जागर करत नववर्षाच्या पूर्वसंध्येला राजर्षी दिनदर्शिकेचे प्रकाशन
‘अवनि’ संस्थेतील मुलींच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करत शाहू छत्रपती फाउंडेशनने जपला राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा
कोल्हापुर : राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांच्या प्रचार आणि प्रसाराचा वारसा जोपासणाऱ्या शाहू छत्रपती फाउंडेशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘ राजर्षी’ या दिनदर्शिकेचे प्रकाशन ‘अवनि’ संस्थेतील मुलींच्या हस्ते नव वर्षाच्या पूर्वसंध्येला करण्यात आले. हणबरवाड़ी येथील ‘अवनि’ संस्थेच्या संकुलात हा प्रकाशन सोहळा झाला.
‘ अवनि’ संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यानी यावेळी बोलताना १९९४ साली आपण कोल्हापुरात आलो तेंव्हा आपल्याला शाहू महाराज आणि त्यांच्या कार्याची काहीच कल्पना नव्हती ,पण आज राजर्षी शाहू आपल्या जीवनाचा श्वास असल्याचे अभिमानाने नमूद केले.
यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या श्री देवी इंदुमती बोर्डिंगचे चेअरमन दुर्वास कदम , शाहू विचारक सिकंदर देसाई, शाहू छत्रपती फॉउंडेशनचे अध्यक्ष प्रा. जॉर्ज क्रुझ, गांधीवादी विचारांचे अभ्यासक आणि ‘ अवनि’ संस्थेच्या कार्याला वाहून घेतलेले मूळ अमेरिकेचे वास्तु विशारद स्कॉट कफोरा, पाचगावचे माजी सरपंच चंद्रकांत कांडेकरी, ज्येष्ठ चित्रकार हारूण पी.सरदार, शाहूकालीन दुर्मीळ वस्तुंचे संग्राहक जाकीर पठाण, प्रा. ड़ॉ.सुरेश पाटील, अंतर्गत वास्तु रचनाकार झाकिर हारूण पी. सरदार,निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय देऊडकर, डी डी पाटील प्रा.ड़ॉ. संजय चोपड़े, आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन शाहू छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक अबूबकर उर्फ जावेद मुल्ला, संचालक नवाब शेख ,’अवनि’ संस्थेच्या कौशल्या भोजे- आग्रे, अहद मुल्ला यानी केले.
एक सकारात्मक विचाराचे व्यासपिठ- POSITIVVE WATCH