कोल्हापूर : अनिकेत बिराडे
जैन धर्मियांचे पवित्र स्थळ असलेल्या झारखंडमधील सम्मेद शिखरजी पर्यटनस्थळ घोषित केल्याच्या निषेधार्थ आज जैन समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातील दसरा चौकातून या मोर्चाला सुरवात झाली, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, महाद्वार रोड, वसंत-बहार रोड मार्गे मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचं रूपांतर सभेत झाले.
झारखंडमधील सम्मेद शिखरजी हे पवित्र धार्मिक स्थळ आहे पण याला पर्यटन स्थळ घोषित करण्यात आल्याने,जैन समाजात त्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
केंद्र सरकारने त्वरित यामध्ये हस्तक्षेप करावा, जोपर्यंत याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत राज्यातील अनेक जिल्हयातून मूक मोर्चे सुरूच राहणार असल्याचं लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी यांनी सांगितले.
जैन समाजाचा मोर्चा असल्याने वाटेमध्ये मोर्चेकऱ्यांसाठी पाण्याची आणि अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती, वसंत बहार रोडवरहीआंदोलकांना मोफत पिण्याचं पाणी देण्यात आलं, मराठा समाज, मुस्लिम समाज यांनीही मोठ्या संख्येने आलेल्या जैन बांधवांना मदतीचा हात दिला.
कोल्हापुरात लव्ह जिहाद विरोधात एकवटले हिंदूत्ववादी- जन आक्राेश माेर्चाने शहर दणाणले! !
मोर्चात जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुजित मिणचेकर, राजीव आवळे, संजय शेटे, माजी परिवहन सभापती प्रतिज्ञा उत्तूरे सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.
लव्ह जिहाद’ गोहत्या बंदी व धर्मांतर याबाबत कठोर कायदा करा…-हिंदु सकल समाजाचा एल्गार
कोल्हापूर सह सांगली विजापूर बेळगाव जिल्ह्यातील सीमा बांधव मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाल्याने शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला, साडेअकरा वाजता मोर्चाला सुरुवात झाली मात्र वेगवेगळ्या भागातून जागा मिळेल तिथे जथेच्या जथे जैन बांधवांचे दिसत होते.