बेरडेवाडीतील सावित्रीच्या लेकींचा प्रबोधनातून जागर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

शिराळा (जी.जी.पाटील)

बेरडेवाडी ता.शिराळा येथील जिल्हापरिषद शाळेतभजन, अभंग ओव्या, उखान्यातून केला सावित्रीमाईचा जागर करून बालिका दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.बेरडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्या तीन वर्षांपासून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतात. त्यातूनच मुलाना प्रेरणा मिळत असते.व आनंददयी शिक्षण मिळत असते.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती माता भगिनींच्या उपस्थितीत प्रबोधनातून सावित्रीचा जागर करत साजरी करण्यात आली.

यावेळी अथर्व धामणकर याने महात्मा फुले व पूर्वा बेरडे या विद्यार्थ्यांनीने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान केली होती. गावातील वृद्ध महिला ,माता पालकांनी , युवतींनी आपल्या मधुर वाणीने ओव्या, भजन , उखाणे सादर करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर घातला, यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे केली.. अंगणवाडी शिक्षिका कांता कंदारे, योगिता बेरडे, पूनम बेरडे , नयना बेरडे, बाळाबाई कंदारे , भागूबाई बेरडे, यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र ओव्यामधून सादर केले.

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वनिता बेरडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून आपले मनोगत व्यक्त केले. ऑनलाईन स्वरूपात स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुप्रिया घोरपडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र लोकरे यांनी केले.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.