शिराळा (जी.जी.पाटील)
येथे जिल्हा परिषद सांगली मार्फत आयोजित शिराळा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कन्या शाळा शिराळा येथील मैदानावर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व गटविकास अधिकारी संतोष राऊत यांचे हस्ते संपन्न झाले.
आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले की, मन, मनगट व मेंदू मजबूत ठेवण्यासाठी खेळ ही अत्यंत आवश्यक बाब आहे. गुणवत्तेबरोबर शारीरिक विकास देखील महत्वाचा असल्याचे प्रतिपादन केले.
लोकांच्या हिताची व सार्वजनिक विकासाची कामे करावी-मानसिंगराव नाईक
याप्रसंगी ध्वजारोहण व क्रीडा ज्योतीचे स्वागत आमदार नाईक केले. स्पर्धेत तालुक्यातील १४ केंद्रातील सुमारे एक हजार पेक्षा जास्त खेळाडू विद्यार्थी सहभागी आहेत. स्पर्धा ३ व ४ जानेवारी अशा दोन दिवस सुरू राहतील. कबड्डी, खो-खो व रिले या सांघिक स्पर्धा व धावणे, लांब उडी व गोळा फेक या वैयक्तिक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यावेळी माजी सभापती श्री. सम्राटसिंग नाईक, विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख, प्रदीप कदम, इतर सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, गट साधन केंद्र कर्मचारी, मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.