कोल्हापूर : वार्ताहर
महालक्ष्मी एक्सप्रेस सोमवारपासून डिझेल ऐवजी इलेक्ट्रिक वर धावण्यास सुरुवात झाली आहे. तर हरिप्रिया एक्सप्रेस देखील मिरज पर्यंत इलेक्ट्रिकवर धावणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे कोल्हापूर रेल्वेच्या इतिहासात आणखी एक नव्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे. गेले काही वर्ष कोल्हापूर मुंबई मार्गावरील विद्युतीकरणाचे काम सुरू होतं. हे काम पूर्ण होऊन त्याची चाचणी ही याआधी घेण्यात आली.
ती आता यशस्वी झाल्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 2 जानेवारीपासून दोन रेल्वे इलेक्ट्रिक वर चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला . त्यानुसार कोल्हापुरातून दुपारी सुटणारी हरिप्रिया एक्सप्रेस मिरज पर्यंत इलेक्ट्रिक वर धावणारा. कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी महालक्ष्मी एक्सप्रेस ला तब्बल अडीच लाख रुपयांचे डिझेल लागत होते. त्यामुळे येता जाता या एक्सप्रेसच्या डिझेलचा खर्च पाच लाख रुपये होत होता. मात्र आता ही रेल्वे पूर्णपणे विद्युतीकरणाच्या माध्यमातून धावणार असल्यामुळे रोजची रेल्वेची पाच लाख रुपयांची डिझेलची बचत होणार आहे.