शिराळा ( जी.जी.पाटील)
गावच्या विकासात सर्व सदस्यांनी विश्वास दाखवावा व सरंपंचानी चांगले योगदान द्यावे. लोकांच्या हिताची व सार्वजनिक विकासाची कामे करावी.गावाचा कारभार आदर्शवत करावा.असे आवाहन आमदार मानसिंगराव नाईक यानी केले. ते सोनवडे (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झालेल्या लोकनियुक्त सरपंच व सदस्यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते.
यावेळी आमदार नाईक यांनी सौ. सोनाली युवराज नाईक व सदस्य सर्जेराव पाटील, पांडुरंग बाबर, दिप्ती नाईक, गणपती पवार, नलिनी कांबळे, संगीता राणे, रविंद्र खंडागळे, मनिषा कुंभार व मंदाताई पाटील यांचे अभिनंदन करून सत्कार केला.या वेळी शामराव नाईक, रवि पाटील, शिवाजी पाटील, आनंदा पाटील, पोपट मोहिते, युवराज नाईक, आनंदा व लक्ष्मण कंदारे, बाजीराव पवार, आनंदा पाटील, बाजीराव व अक्षय नांगरे, निलेश कळंत्रे, विठ्ठल राणे, मधुकर, विठ्ठल, तुकाराम व आनंदा खोत, आनंदा मस्कर, माजी सरपंच सुवर्णा सुतार आदी उपस्थित होते.
गाव तुमचंं.. विकास साधा.. पब्लिसीटी आम्ही करताे…- POSITIVVE WATCH- प्रत्येक चांगल्या कार्याची दखल आम्ही घेऊ…