काँग्रेसच्या जिल्हाधक्षपदी पुन्हा सतेज पाटील, शहराध्यक्षपदी प्रवीण केसरकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक मजबूत

कोल्हापूर – काँग्रेस पक्षाने कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत जिल्हाध्यक्षपदी त्यांची फेरनियुक्ती केली आहे. तर शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी नगरसेवक प्रवीण केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सी. वेणूगोपाल यांनी बुधवारी या नियुक्त्या जाहीर केल्या.

सन २०१९ मध्ये जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मोठे काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला उल्लेखनीय यश मिळाले. त्याचबरोबर महापालिका, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही काँग्रेसने दमदार कामगिरी दाखवली. ग्रामीण भागातील संघटन बांधणी, कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क आणि आक्रमक राजकीय भूमिका यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, शहर काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल करत विद्यमान शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या जागी नगरसेवक प्रवीण केसरकर यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात काँग्रेसची ताकद कायम राखणे, नव्या कार्यकर्त्यांना संधी देणे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना अधिक सक्षम करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

काँग्रेस पक्षाने राज्यभर संघटनात्मक फेरबदल करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती केली होती. कोल्हापूर ग्रामीणसाठी जयशंकर पाठक, तर शहरासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कार्यकर्त्यांच्या भावना आणि मते जाणून घेतली होती. त्यांचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतरच या नियुक्त्यांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. या निवडीसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे मार्गदर्शन लाभल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.