वारणा दूध संघाच्या अध्यक्षपदी एच. आर. जाधव यांची तर उपाध्यक्षपदी अँड. एन. आर. पाटील यांची बिनविरोध निवड

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

बिनविरोध निवड झालेबद्दल सत्कार करताना वारणा समुहाचे प्रमुख आमदार डाॅ. विनय कोरे सोबत इतर मान्यवर

वारणानगर – देशातील दुग्ध व्यवसाय क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या अध्यक्षपदी हिंदुराव रंगराव जाधव (एच.आर.) (बहिरेवाडी) व उपाध्यक्षपदी अँड. नेमगोंडा रायगोंडा पाटील (एन.आर.) (किणी) यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केली.

आमदार डॉ. विनय कोरे यांच्या मार्गदशनाखाली वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाची पंचवार्षिक निवडणुक सलग आठव्यांदा नुकतीच बिनविरोध पार पडली. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी संघाच्या प्रधान कार्यालयात निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलाविण्यात आली. मात्र त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे निवडणूक प्रक्रिया पाडली. यावेळी नूतन अध्यक्षपदी एच. आर. जाधव तर उपाध्यक्षपदी एन. आर. पाटील यांच्या नावाची घोषणा केली. याप्रसंगी नूतन पदाधिकारी व सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पन्हाळा प्रांतअधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी समीर शिंगटे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), प्रदीप मालगावे उपस्थितीत होते.

सहकारमहर्षि तात्यासाहेब कोरे यांनी दूरदृष्टीतून स्थापन केलेल्या आणि तीन पिढ्यातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करत वारणा दूध संघाच्या सभासदांनी बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवत सहकार शक्तीचा पाया भक्कम करून देशात आदर्श पायंडा पाडला आहे. सभासदांनी दाखवलेला हा विश्वास आम्ही याही पूढे जपू असे आमदार डॉ. विनय कोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी नूतन अध्यक्ष एच. आर. जाधव म्हणाले आमदार डॉ. विनय कोरे यांचे मार्गदर्शनाखाली स्व.सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांचा सहकाराचा वसा आणि वारसा दृष्टीपथात ठेवून येणाऱ्या काळात संचालक मंडळासमवेत अधिक आदर्शवत काम करू असे सांगितले. प्रारंभी स्वागत कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी केले. यावेळी नवनिर्वाचित संचालक शिवाजी कापरे, अभिजित पाटील, शिवाजी जंगम, अरुण पाटील,प्रदीप देशमुख, माधव गुळवणी, राजवर्धन मोहिते, डॉ.मिलिंद हिरवे, दिपकराव पाटील, के.आर. पाटील, महेंद्र शिंदे, लालासो पाटील, अधिकराव पाटील, विश्वास पायमल, सागर पाटील, संजय देसाई, नाजीया मुल्ला, तेजस्विनी पाटील यांच्यासह अकौंटस मॅनेजर प्रवीण शेलार ,उत्तम कणेरकर,सचिन माने, व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

अनपेक्षीत निवड आणि ११ लाख लिटर प्रतिदिन दूध संकलनाचा संकल्प. वारणा दूध संघाचे अध्यक्ष स्वता: विनय कोरे होते. तर उपाध्यक्ष एच. आर. जाधव होते. आजच्या निवडीत उपाध्यक्ष जाधव यांना अध्यक्षपदाची तर अँड. एन. आर. पाटील यांना उपाध्यक्षपदाची अनपेक्षीत संधी दिल्याची घोषणा केल्यानंतर नूतन पराधिका ऱ्यांना सुखद धक्का दिला. ‘वारणा’ च्या सभासदांनी संचालक मंडळावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत संचालक मंडळाने दूध उत्पादन वाढीवर भर देत पुढील निवडणूकीपूर्वी ११ लाख लिटर प्रतिदिन दूध संकलनाचा संकल्प आमदार डॉ. विनय कोरे यांनी जाहीर केला.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.