मविप्रचे प्रा. डॉ. किरणकुमार जोहरे यांच्या एआय संशोधनाला पी. एच. डी. पदवी प्रदान

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विकसित भारत २०४७’चे ध्येय साध्य करणारे नाविण्यपूर्ण पी. एच. डी. संशोधन भारतीय शेतकरी व घरगुती महिलांना समर्पित!

नाशिक – नाशिकचे संशोधक प्रा. डॉ. किरणकुमार प्रेमचंद जोहरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून विज्ञान व तंत्रज्ञान या शाखे अंतर्गत इलेक्ट्रॉनिक सायन्स विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. एआय वापरासहचे हे संशोधन घरगुती जीवन अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि बुद्धिमान बनविण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहे.

प्रा. किरणकुमार जोहरे यांनी आपले पी.एच.डी. संशोधन भारतीय शेतकरी आणि घरगुती महिलांना कृतज्ञतापूर्वक समर्पित केले आहे. आंतराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ, ढगफुटी तज्ज्ञ तसेच एआय तज्ज्ञ अशी जागतिक स्तरावर ओळख असलेले प्रा. किरणकुमार जोहरे हे ख्यातनाम चित्रकार तसेच मविप्रचे माजी प्राचार्य प्रेमचंद नथुजी जोहरे यांचे चिरंजीव आहेत. ते मराठा विद्या प्रसारक (मविप्र) च्या कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत येथील इलेक्ट्रॉनिक सायन्स व कॉम्प्युटर सायन्स विभागात कार्यरत आहेत.

“एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) अँड आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्स) असिस्टेड होम ऑटोमेशन” या विषयावर त्यांनी अन्नसुरक्षा व ऊर्जा बचतीसाठी कार्यक्षम संशोधन प्रबंधाचे विद्यापीठात प्रत्यक्ष ऑफलाईन सादरीकरण केले. या संशोधनामध्ये एज एआय (Edge AI) अल्गोरिदमचा वापर अभिनव वापर करून पारंपरिक होम ऑटोमेशन प्रणालीतील मर्यादा दूर करण्यात आल्या असून, भारतीय घरांसाठी उपयुक्त अशी स्वयंचलित, बुद्धिमान आणि किफायतशीर प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संशोधनाअंतर्गत सहा नाविन्यपूर्ण व महत्त्वाच्या प्रणाली प्रा. किरणकुमार जोहरे यांनी विकसित केल्या आहेत. यात वातावरण विद्युत तीव्रतेचे मोजमाप व विजेच्या कडकडाटाच्या पूर्वसूचनेसह जीवन व मालमत्तारक्षक अलर्ट यंत्रणा, घरगुती वीज वापर मोजणी, बचत व स्वयंचलित नियंत्रण यंत्रणा, गॅस सिलिंडर निरीक्षण व स्वयंचलित नोंदणी यंत्रणा, दूध उतू जाणे प्रतिबंधक स्वयंचलित यंत्रणा, कुकर शिट्टी नियंत्रण स्वयंचलित यंत्रणा आणि स्मार्ट गार्डन प्लांट वॉटरिंग सिस्टिम यांचा समावेश आहे. या सर्व नमुना प्रणाली (प्रोटोटाइप) कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री व एकंदर जनहितासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आहेत.

प्रा. किरणकुमार जोहरे यांच्या आठ वर्षांच्या पीएच.डी. संशोधन कालखंडात आंतरराष्ट्रीय स्तरावर १५ रिसर्च पेपर्सचे प्रकाशन, २४ आंतरराष्ट्रीय परीषदेतून शोधनिबंधांचे सादरीकरण, दोन आंतरराष्ट्रीय बुक चॅप्टर्सचे प्रकाशन व भारत सरकारचे एक वैयक्तिक पेटंट मिळविणे अशी भरीव कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे गेल्या २९ वर्षांत त्यांचा हा पीएच.डी.चा चौथा प्रयत्न यावेळी यशस्वी ठरला आहे. या संशोधनासाठी त्यांना निमगाव येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण व्ही. पाटील, व्ही. एन. नाईक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. वसंत जी. वाघ तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी रजिस्ट्रार व इलेक्ट्रॉनिक्स सायन्स माजी विभाग प्रमुख डॉ. अरविंद डी. शाळीग्राम यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी चेअरमन म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक सायन्स विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. विकास मठे, तर रेफ्री म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ व भारतात ११०० पेक्षा जास्त स्कोपस इंडेक्स जर्नलमध्ये दर्जेदार रिसर्च पेपर्स प्रकाशित करीत रेकॉर्ड ब्रेक करणारे एकमेव महाराष्ट्रीयन असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. संजय जनराव ढोबळे प्रत्यक्ष उपस्थित होते. या संशोधनामुळे अन्नसुरक्षा, ऊर्जा बचत आणि घरगुती सुरक्षिततेत जागतिक पातळीवर लक्षणीय वाढ शक्य होणार आहे. तसेच संसाधनांचा कार्यक्षम वापर वाढवून हे संशोधन ‘विकसित भारत २०४७’चे ध्येय साध्य करण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

*!!!प्रा. किरणकुमार जोहरे यांनी महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी, नाशिक येथील इलेक्ट्रॉनिक सायन्स संशोधन केंद्रात संशोधनकार्य पूर्ण केले.!!!

प्रा. किरणकुमार जोहरे यांच्या यशाबद्दल मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, निफाड तालुका संचालक शिवाजी गडाख, महिला संचालिका श्रीमती शोभा भागवत बोरस्ते, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर डोखे, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र मोरे, सुनिल पाटील व सर्व सदस्य, प्राचार्य प्रोफे. (डॉ.) वसंतराव बी. कदम, प्राचार्य प्रोफे. डॉ. सुरेश जाधव, प्राचार्य डॉ. कल्पना अहिरे, प्राचार्य डॉ. बापू सोनू जगदाळे, संशोधन केंद्र समन्वयक डॉ. अनिल पाटील, कार्यालयीन अधीक्षक संदीप नाथे, उपप्राचार्य दिलीप माळोदे, नॅक समन्वयक डॉ. प्रशांत कोळी, आयक्यूएसी समन्वयक प्रा. भगवान कडलग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी कौतुक व अभिनंदन केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.