डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६ विद्यार्थ्यांची एच. पी. मध्ये निवड

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

वार्षिक ८.५ लाख रुपयांचे पॅकेज 

कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडाच्या ६ विद्यार्थ्यांची हिवलेट पॅकार्ड (एचपी) या नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ८.५ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एआयएमएल विभागाचे अभिनव शिवाजी गावडे व सोनाली भानुदास माळी, कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या अदिती दीपकसिंह पाटील व राधेय प्रकाश पाटील तसेच डाटा सायन्स विभागाच्या सानिका सातप्पा पाटील व तनिष्का अमरसिंह पवार यांचा समावेश आहे.

हिवलेट पॅकार्ड (एचपी) ही जागतिक स्तरावरील अग्रगण्य तंत्रज्ञान कंपनी असून संगणक, प्रिंटिंग, क्लाउड आणि डिजिटल सोल्यूशन्स क्षेत्रात कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, कम्युनिकेशन स्किल, ग्रुप डिस्कशन आणि ऑनलाईन प्रशिक्षणावर महाविद्यालयाकडून विशेष भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होत असून चांगल्या कंपन्यामध्ये प्लेसमेंट मिळत असल्याचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सांगितले.

या विद्यार्थ्यांना अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईगडे, विभागप्रमुख, प्लेसमेंट समन्वयक तसेच सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.