सायलेज तंत्रज्ञानामुळे दुग्ध व्यवसायाला चालना, गोकुळमध्ये नेदरलँडच्या तज्ज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

प्रशिक्षण दरम्यान सायलेज निर्मिती स्थळ पाहणी, गोठा भेटी, प्रात्यक्षिके, सादरीकरणे व गटचर्चा

कोल्हापूर (POSITIVE WATCH) – ‘गोकुळ’ दूध संघाच्या शेतकरी-केंद्रित कामकाजाचे विशेष कौतुक केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, सायलेज प्रकल्पांची अंमलबजावणी व शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविलेले उपक्रम अनुकरणीय आहेत. ‘गोकुळ’सारख्या सहकारी संस्थांमुळे दुग्धव्यवसाय अधिक सक्षम होत आहे.’ असे गौरवोद्गार नेदरलँड येथील प्रगतशील शेतकरी हेंड्रिक्स व्हॅन व्हिस्क यांनी काढले.

दुग्ध व्यवसाय आणि पशुधन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘गोकुळ’ दूध संघाने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर नेदरलँड्स मधील पी.यु.एम. (प्रोजेक्ट आउट सेंडर मॅनेजर्स) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने सायलेज (मुरघास) या विषयावर विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. नेदरलँड्सचे प्रगतशील शेतकरी हेंड्रिक्स व्हॅन व्हिस्क यांच्या मार्गदर्शनाखाली हे दहा दिवसांचे प्रशिक्षण झाले. गुणवत्तापूर्ण सायलेजमुळे दुधाचे उत्पादन व गुणवत्ता वाढते, पशुपालकांचा खर्च कमी होऊन नफा वाढतो. सायलेज तयार करताना कच्चा माल व योग्य वैरणीची निवड, आर्द्रता नियंत्रण, योग्य साठवण आणि वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. दौऱ्यादरम्यान त्यांनी गोकुळ दूध संघाशी संलग्न शिंदेवाडी येथील वैरण बँक, विविध दूध संस्था तसेच मुक्त गोठ्यांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व मार्गदर्शन केले.

प्रशिक्षण दरम्यान सायलेज निर्मिती स्थळ पाहणी, गोठा भेटी, प्रात्यक्षिके, सादरीकरणे व गटचर्चा यांच्या माध्यमातून पशुवैद्यकीय अधिकारी, सुपरवायझर व दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विकास कक्ष, ताराबाई पार्क येथे गोकुळचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रिक यांच्या हस्ते हेंड्रिक्स व्हॅन व्हिस्क यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सुद्रिक म्हणाले की, गोकुळ व पी.यु.एम. यांच्यातील करारामुळे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन सातत्याने मिळत असून, याचा दुग्धव्यवसायाच्या प्रगतीसाठी निश्चितच मोठा फायदा होणार आहे. यावेळी प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सुनिल धायगुडे, सागर बलकवडे, चंद्रकांत परूळेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, डॉ. दयावर्धन कामत, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.