निमित्त इंग्रजी नववर्षाचे
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक परिसरात स्वच्छता मोहीम राबवून अभिवादन
जानेवारी २०२३ इंग्रजी नववर्षाची सुरवात या निमित्ताने शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने या नववर्षाची सुरवात रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक परिसरामध्ये स्वच्छता मोहीम रावबून व छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून करण्यात आली.
सकाळी स्वच्छता मोहिमेस सुरवात करण्यात आली झाली. यावेळी स्मारक परिसराची झाड लोट करून झाल्यानंतर प्रतिष्ठानच्या वतीने स्वखर्चातून आणलेल्या पाण्याच्या टँकर द्वारे संभाजी महाराजांच्या स्मारकाची, मूर्तीची व स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच स्मारका जवळील असणाऱ्या ध्वजस्तंभावर नवीन भगवा ध्वज देखील फडकवण्यात आला. त्यानंतर छत्रपती शंभूराजेंच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून व पूजन करून अभिवादन करण्यात आले. अशा प्रकारे या नववर्षाची सुरवात एका चांगल्या उपक्रमाद्वारे करण्यात आली.
VIDEO पहा..निळ्या लिंकवर क्लिक करा. –https://youtu.be/xHdJJlKg_bI
या उपक्रमात प्रतिष्ठानचे अध्यक्ष – साताप्पा कडव, उपाध्यक्ष – योगेश रोकडे, संदीप पाडळकर, प्रफुल्ल भालेकर, निलेश पिसाळ, प्रवीण कुरणे, बजरंग गावडे, मनीष बडदारे , दयानंद पाटील, भूषण तावडे , सुरज सुतार , प्रशांत पाटील, श्रेयस कुरणे , प्रतीक जगताप, आदित्य पाटील, सुनील पाटील आदींनी सहभाग घेतला. यावेळी शिवशक्ती प्रतिष्ठान परिवारचे अन्य सदस्यही उपस्थित हाेते.