लांजात इलेक्ट्रॉनिक दुकान आगीत जळून खाक, 7 लाखांचे नुकसान

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

संगमेश्वर /प्रतिनिधी

लांजा तालुक्यातील देवधे फाटा येथे इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. या आगीत 7 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.मुंबई गोवा महामार्गावरील देवधे येथे रोहित कांबळे यांच्या मालकीचे रोहित इलेक्ट्रॉनिक्स दुकान आहे. या दुकानाला सोमवार 2 जानेवारी 2023 रोजी पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.

अचानक आगीने रौद्ररूप धारण केले. परिसरातील नागरिकांनी इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग लागल्याचे पाहताच मालक कांबळे यांना याची माहिती दिली. मात्र कांबळे हे बाहेर गावी गेले होते. ते नुकतेच परतले होते. माहिती कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले होते. दुकानातील इलेक्ट्रिकल्स सामानाचे ७ लाखाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सर्वात आधी बातमी रत्नागिरी 24 न्यूज वर. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत लांजा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.