WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

पत्रकार रजिस्ट्रार व महामंडळ हवे: शीतल करदेकर; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’ तर्फे राज्यपातळीवरील दर्पण’ पुरस्कारांचे वितरण

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699याेग्य दरात याेग्य स्थितीतील , पूर्ण चालू कंडीशनमधील अटाेमँटीक वाँशिग मशीन विकणे आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा- 8380099974

सिंधुदुर्ग : ”पत्रकारितेद्वारे ठाम मत मांडण्याची परंपरा ‘दर्पण’ ने सुरू केली. बाळशास्त्रींनी ‘दर्पण’ च्या माध्यमातून ब्रिटिश राजवटीला आरसा दाखवला; तेच काम पत्रकारितेत आजही सुरू आहे. पत्रकार आपल्या लेखणीतून क्रांती घडवत असतात. भौतिक प्रगतीच्या, विकासाच्या मागे पत्रकारिताही दडलेली असते”, असे मत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.

‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’ तर्फे देण्यात येणार्‍या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित ३० व्या ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण, कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे व कुडाळ (जि.सिंधुदुर्ग) येथील ज्येष्ठ राष्ट्रीय कलावंत पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते पोंभुर्ले (जि. सिंधुदुर्ग) येथील ‘दर्पण’ सभागृहात संपन्न झाले. त्यावेळी ना.चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ होते. व्यासपीठावर माजी आमदार अजित गोगटे, जेष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, पोंभुर्लेच्या सरपंच प्रियांका धावडे, माजी सरपंच सादिक डोंगरकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव व कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्वस्त विजय मांडके, सुधाकर जांभेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ना.चव्हाण पुढे म्हणाले, ”प्रत्येक कामात अडचणी, मर्यादा असतात. पण सकारात्मक मानसिकतेने काम केले तरच ‘समृद्धी’ येत असते; त्यानुसार पोंभुर्ले व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे सर्व प्रश्न आपण मार्गी लावू”, असे सांगून, ”जाभेकरांच्या रूपाने पत्रकारीतेचि व्यवस्था आज उभी आहे. पूर्वी पत्रकारांच्या स्तंभ लेखनाचा परिणाम राजकारणावर होत असे. मात्र आज हे लेखन लुप्त पावत चालले आहे”, अशी खंत ही ना. चव्हाण यांनी व्यक्त केली.

”पत्रकारिता आणि राजकारण यांचा जवळचा संबंध आहे. राजकारण करताना नेहमीच पत्रकारांकडून दिशा मिळते. आज मराठी पत्रकारितेने मोठा नावलौकिक मिळवला आहे. बाळशास्त्रींचे नाव जगभरात जावे, आपल्या राज्यासह देशभरातील पत्रकार पोंभुर्ले येथे यावेत या दृष्टीने येथील स्मारकाचा व गावाचा विकास करण्यासाठी आपण स्वतः शासनामध्ये पाठपुरावा करु”, असे आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

पद्मश्री परशुराम गंगावणे म्हणाले, ”पत्रकार नेहमीच अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करीत असतात. पत्रकारांनी मागे वळून न पाहता असेच पुढे चालत रहावे. पत्रकारांच्या कार्याचा गौरव करणारा आजचा पुरस्कार समारंभ अभिमानास्पद आहे.”

ज्येष्ठ पत्रकार शीतल करदेकर काय म्हणाल्या पहा लिंक सविस्तरः

 https://youtu.be/i9ffJU0i8J4 पत्रकारांनी आता एकजूट व्हायला पाहिजे न्याय हक्कासाठी

अध्यक्षीय भाषणात रविंद्र बेडकिहाळ यांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या स्थापनेची व बाळशास्त्रींच्या स्मारक कार्याची माहिती देऊन, “शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाकडून शासनाभिमुख, लोकाभिमुख कार्याबरोबरच पत्रकाराभिमुख काम व्हावे, शासनाकडून कर्मभूमी मुंबईत बाळशास्त्रींचे स्मारक व्हावे, पोंभुर्ले गाव व स्मारकाच्या विकासासाठी ना.रवींद्र चव्हाण व आ.नितेश राणे यांनी सहकार्य करावे, पोंभुर्ले गावाला ‘क’ वर्ग पर्यटनाचा दर्जा मिळावा”, आदी अपेक्षा व्यक्त केल्या.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालखीचे स्वागत, ‘दर्पण’ स्मारकातील बाळशास्त्रींच्या अर्धपुतळ्यास अभिवादन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.समारंभाच्या निमित्ताने ‘दर्पण’ स्मरणिकेचे प्रकाशन संपन्न झाले. त्यानंतर सन २०२२ च्या प्रतिष्ठेच्या ‘दर्पण पुरस्कारां’चे वितरण सम्पन्न झाले.

  • ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत राज्यस्तरीय ‘धाडसी पत्रकार’ पुरस्कार – सौ.शीतल करदेकर (मुंबई),
  • राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार कोकण विभाग – शैलेश पालकर (पोलादपूर) व सुरेश कौलगेकर (वेंगुर्ला),
  • उत्तर महाराष्ट्र विभाग – जयप्रकाश पवार (नाशिक), विदर्भ विभाग – डॉ.राजेंद्र मुंढे (वर्धा),
  • पश्‍चिम महाराष्ट्र विभाग – अनुराधा कदम (कोल्हापूर),
  • मराठवाडा विभाग – प्रल्हाद उमाटे (नांदेड),
  • विशेष ‘दर्पण’ पुरस्कार – सदाशिव मोहिते (फलटण) व किरण बोळे (फलटण) यांचा समावेश होता.

पुरस्कार प्राप्त पत्रकारांच्या वतीने बोलताना सौ.शीतल करदेकर म्हणाल्या, “आज अनेकदा खरा पत्रकार कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे. यासाठी नियमावली तयार व्हावी. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती व्हावी.” शैलेश पालकर म्हणाले, ” बाळशास्त्रींचे विस्मरण मराठी भाषिकांकडूनच होत आहे. पत्रकार हा रोजचा साहित्यिक असतो. त्यामुळे विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उपक्रमातून बाळशास्त्रींचे नाव जागतिक स्तरावर न्यावे.” स.रा.मोहिते यांनी,” जांभेकरांच्या जन्मभूमीत मिळालेला पुरस्कार सर्व पत्रकारांना स्फूर्तिदायी ठरेल”, असे सांगितले. यावेळी सरपंच सौ.प्रियांका धावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय मांडके यांनी केले. आभार व सूत्रसंचालन संस्थेचे विश्वस्त अमर शेंडे यांनी केले.

सर्व पत्रकार बांधवांचे दिलसे अभिनंदन, पुढील वाटचालीस शुभेच्छा- POSITIVVE WATCH MEDIA TEAM

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी