शिराळा (जी.जी.पाटील)
आरळा (ता. शिराळा) येथील श्री घोडावली बनशंकरी देवीच्या यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या निकाली कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकांच्या कुस्तीत पै.भारत मदने (बारामती) विरुध्द पै.कौतुक डाफळे (आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे) यांच्यात चाळीस मिनीटे खडाखडी झालेली कुस्ती पंचाच्या निर्णयाने गुणावर खेळविण्यात आली यामध्ये पै.भारत मदने यांने पहीला गुण घेतल्याने त्यास विजयी घोषीत करण्यात आले.
प्रारंभी कुस्ती मैदानाचे पुजन ग्रामस्थ व यात्रा कमेटी यांच्या उपस्थीतीत करण्यात आले.दुसर्या क्रमाकासाठी पै.विष्णु खोसे (सह्याद्री कुस्ती संकुल- पुणे) विरुध्द पै.पोपट घोडके (आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल – पुणे)यांच्यात झालेल्या प्रेक्षणीय कुस्तीत पोपट घोडके याने समोरुन हापकी मारुन विष्णु खोसे यास चितपट करुन उपस्थीतांची वाहवा मिळवली.
बिनविराेध निवड…सोनवडेत सर्जेराव पाटील उपसरपंच
तिसर्या क्रमाकासाठी पै.दत्ता नरळे (गंगावेश तालीम,कोल्हापुर) व पै.विक्रम शेटे(इचलकरंजी) यांच्यात झालेली कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली तसेच चौथ्या क्रमाकासाठी पै.अमर पाटील(गंगावेश तालीम,कोल्हापुर) विरुध्द पै.उदय खांडेकर (पुणे) यांच्यात झालेल्या कुस्तीमध्ये अमर पाटील याने लपेट डावावर उदय खांडेकार यास आस्मान दाखवुन उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.दरम्यान या कुस्ती मैदानात दत्ता बानकर,नामदेव केसरे,ओंकार जाधव,प्रथमेश गुरव,बाला इनामदार,निलेश कदम,विवेक लाड,अशुतोष लाड शुभम पाटील,राजर्वधन पाटील,कृष्णा घोडे,इंंद्रजीत वनारे,मयुर रोकडे,प्रणव पाटिल,निलेश कदम या मल्लांच्या चटकदार कुस्त्या झाल्या.
या मैदानासाठी माजी सभापती हणमंतराव पाटील,युवानेते- भुषण नाईक,पै.संपत जाधव,पै.भिमराव माने, प्रकाश धामणकर,उपसरपंच -राजेश सुर्यवंशी,माजी उपसभापती- नथुराम लोहार,माजी सरपंच- हिंदुराव नांगरे,शंकरदादा मोहीते,विश्वनाथ देशपांडे, फय्याज डांगे, विजय भाडुगळे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंच म्हणून संपत जाधव,राहुल जाधव,तात्या इंगळे,राजाराम लोहार,संदिप चौगुले,यशवंत घोडवील,शिवाजी पाटील,किशोर डिसले,नानासो गायकवाड यांनी काम पाहीले .या कुस्ती मैदानाचे समालोचन सुरेश जाधव यांनी केले मैदानासाठी परीसरातील कुस्तीशौकीन मोठ्या संख्येने उपस्थीत होते तसेच हे कुस्ती मैदान यशस्वी होण्यासाठी आरळा ग्रामपंचायत पदाधिकारी व यात्रा कमेटीने परीश्रम घेतले.
प्रत्येक उपक्रमाला, क्रीडा क्षेत्राला पाँझिटीव्ह वाँचची साथ,, तुमची बातमी आमच्या न्यूज पाेर्टलवर