शिराळा (जी.जी.पाटील)
सोनवडे ता.शिराळा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सर्जेराव विष्णु पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सोनवडे ग्रा.पं.कार्यालयात लोकनियुक्त सरपंच- सौ.सोनाली युवराज नाईक यांचे अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली मात्र उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस प्रणीत जोतिर्लिंग विकास परीवर्तन पॅनेचेल नवनीर्वाचीत सदस्य सर्जेराव विष्णु पाटील यांचे विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्यामुळे सर्जेराव पाटील यांची उपसरपंच म्हणुन बिनविरोध निवड करण्यात आली.
सोनवडे ग्रा,पं.निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेस प्रणीत जोतिर्लिंग विकास परीवर्तन पॅनेलने सरपंच पदासह दहा जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले होते सोनवडे ग्रा.पं.कार्यालयात पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणुन- किशोरकुमार राजमाने,सहा.निवडणुक अधिकारी- बी.बी.पाटील,ग्रामसेवक- गणेश पेटकर,अरुण रेळेकर यांनी काम पाहीले.दरम्यान या निवडीनंतर ग्रामस्थांच्यावतीने नवनिर्वाचीत लोकनियुक्त सरपंच सोनाली नाईक,उपसरपंच – सर्जेराव पाटील, सदस्य-रविंद्र खंडागळे,पांडुरंग बाबर,गणपती पवार,दिप्ती नाईक,मनिषा कुंभार,मंदाताई पाटील,संगीता राणे,नलीनी कांबळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शामराव नाईक,शंकरदादा मोहीते,रवी पाटील बाबुराव नांगरे,शिवाजी पाटील,युवराज नाईक,प्रकाश लोखंडे ,प्रताप नाईक,गोरख कुंभार यांचेसह ग्रामस्थ उपस्थीत होते.