गुजरातची बोट रत्नागिरी सागरी हद्दीनजीक बुडाली; दोन खलाशांचा मृत्यू, एक बेपत्ता
रत्नागिरी: गुजरात येथील मच्छिमारी नौका रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीबाहेर समुद्रात बुडाल्याची घटना घडली असून या नौकेतील बचावलेल्या आणि मृत खलाशांना घेऊन कोस्टगार्डचे अधिकारी मिरकरवाडा बंदरात दाखल होत आहेत. या घटनेने मच्छीमारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
ही १३ गावे संवेदनशील क्षेत्राबाहेर असल्याचा राज्य शासनाचा दावा..गावे वगळा.. उत्खनन सुरू हाेणार?
जयगड पासून १२० नॉटिकल माईल क्षेत्राबाहेर हि घटना घडली आहे. ही घटना घडताच कोस्ट गार्ड कडून युद्धपातळीवर बचाव कार्य करण्यात आले. बोटीवर नऊजण असल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी दोन खलाशी मृत झाले असून एकजण बेपत्ता झाला आहे. खलाशंच्या बचावासाठी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने आणि बोटीच्या सहाय्याने मदतकार्य करण्यात आले. बुडलेल्यांपैकी चार जणांना वाचवण्यात यश आले आहे.