बांबवडे : तत्कालीन शासनाने चनवाड – शाहूवाडी ग्रामपंचायती वर अन्याय केला आहे. मात्र चनवाड – शाहूवाडी नगरपंचायत करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठ पूरावा करणार असलयाचे प्रतिपादन खासदार धैर्येशील माने यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर येथे चनवाड – शाहूवाडी नगरपंचायत होण्यासाठी शाहूवाडी नगरपंचायत कृति समितीच्या वतीने खासदार धैयेशील माने यांना निवेदन दिले त्यावेळी त बोलत होते. शाहूवाडी तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायत होण्या साठी राज्य शासनाने परिपत्रक काढले होते . मात्र अद्याप चनवाड – शाहूवाडी नगरपंचायत झालेली नाही. त्यामुळे शाहूवाडी ग्रामस्थांनी निवडणूकीवर बहिब्कार टाकला आहे.
विकास कामावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. गावचा विस्तार होत असल्याने नागरीकांना मुलभूत सुविधा ग्रामपंचायत पूरवू शकत नसल्या मुळे नगरपंचायत होणे गरजेचे असलयाचे माजी सरपंच दिपक जाधव यांनी संगितले .
शिष्ट मंडळात तालुका प्रमुख विजयसिह देसाई , आनंद भोसले , दिपक जाधव , सुदाम कांबळे ‘ सुहास लाड , आनंदा आस्वले ‘ सुरेश पाटील – गुरव . अमर शिंदे , चंद्रकात म्हापसेकर , बापू लाळे आदीसह ग्रामस्थ , कृतिसमितीचे पदाधिकारी उपस्थित होते .