शिराळा (जी.जी.पाटील)
येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावरील गोरख चिंचेचा परिसर विद्यार्थ्यांचे अभ्यासिका केंद्र म्हणून समोर येत आहे. श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर, प्रेस क्लब ऑफ शिराळा व शिराळ्यातील दानशूर मंडळींच्या सहकार्यातून झालेले संवर्धन परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर ने पुढाकार घेऊन गोरख चिंच परिसर सुशोभीकरण करण्याचे ठरवले होते. यातून प्रेस क्लबच्या सहकार्याने आणि शिराळ्यातील दानशूर मंडळींनी एकत्रित येत या ठिकाणी गोरख चिंचेच्या सभोवती मोठा कट्टा बांधला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी शाळांच्या पिकनिक येत आहेत. गावातील अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी हे ठिकाण व परिसर आवडीचा ठरला आहे. मुख्य रस्त्याचे पासून लांब असल्याने अतिशय शांत ठिकाण आहे. ह्या परिसराचा कायापालट करण्यासाठी खासदार धैर्यशील माने, आमदार मानसिंगराव नाईक आदी शासन स्तरावरून मोठा निधी आणण्यासाठी प्रयत्न शिल आहे.
गुणवत्तेबरोबर शारीरिक विकास देखील महत्वाचा-मानसिंगराव नाईक
तर या ठिकाणचे वातावरण शांत असल्यामुळे येथे अभ्यास करणाऱ्यांची संख्या देखील वाढत चालली आहे. त्यामुळे शिराळ्यातील गोरख चिंच एक अभ्यासिका केंद्र म्हणून समोर येऊ लागले आहे. हा परिसर अतिशय नयनरम्य आहे. लहान पणा पासून वृक्षाच्या बाबतीत एक सकारात्मक भावना तयार होत आहे. या शाळेतील मुले ही येथील स्वच्छता ठेवत आहे. त्यामुळे संवर्धन करण्याकरता पुढाकार घेतलेल्या मंडळी मधून समाधान व्यक्त होत असून परिसरात हा विषय कौतुकाचा ठरत आहे.
प्रत्येक चांगल्या सत्कार्यासाठी POSITIVVE WATCH नेहमीच आपल्या साेबत… दखल
घेणार..