कोल्हापूर: राज्यातील सत्तासंघर्षाच्या घडामोडीत शिवसेना पक्षात गट पडले असले तरी कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी केलं. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.
महाविकास आघाडीशी टक्कर देण्यासाठी भाजपची तयारी सुरू, राज ठाकरेंसोबत होऊ शकते नवी युती
आगामी निवडणुका महाविकास आघाडी मधील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र लढवणार आहेत. पुढील निवडणुकीत जनताच सर्वांना जागा दाखवेल, त्यावेळी जनतेच्या भावना काय आहेत हे समजतील. असे म्हणून शरद पवार पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये कोणतेही अंतर्गत वाद नाहीत. परंतु आमच्यात मतभेद सुरू असतील तर ते आम्ही बैठक घेवून सोडवू असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी आमदार सतेज पाटील, माजी आमदार के पी पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, उद्योगपती व्ही. बी. पाटील उपस्थित होते.