- चंदगड
इयता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आकांक्षा विश्वनाथ गावडे हिने तालुक्यात ग्रामीणमध्ये २६० गुण मिळवून प्रथम आली . तिच्या या यशामुळे याआधी आसगाव गांवच्या शिष्यवृत्तीची दहा वर्षापूर्वीच्या अखंड परंपरेचे स्मरण झाले .. आकांक्षाचे तिसरीपर्यंतचे शिक्षण आसगावमध्ये झाले . त्यांनतर इयता चौथी प्रज्ञाशोध परीक्षा , पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्येही हल्लारवाडी शाळेतून तसेच इयता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा कन्याशाळा चंदगड येथून तिची अव्वल क्रमांकाने निवड झाली . स्पर्धा परीक्षेबरोबरच चित्रकलेची तिला विशेष आवड व कौशल्य आहे . आठवी शिष्यवृत्तीच्या यशासाठी त्यांच्या संजय गांधी विद्यालय नागनवाडीमधून यश मिळाले . के . डी . बारवेलकर , व्ही . बी . पाटील , मुख्याध्यापक एम . आर . भोगुलकर व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले . सातवी प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी पुजा तुपारे यांनी करून घेतली होती . तुडये हायस्कूलचे आर . डी . पाटील यांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले . आकांक्षाचे वडील विश्वनाथ गावडे हे स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करत असाल्याने मुलीच्या यशाने ते कृतार्थ झाले .
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.