चंदगड- इयता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आकांक्षा विश्वनाथ गावडे हिने तालुक्यात ग्रामीणमध्ये २६० गुण मिळवून प्रथम आली . तिच्या या यशामुळे याआधी आसगाव गावच्या शिष्यवृत्तीची दहा वर्षापूर्वीच्या अखंड परंपरेचे स्मरण झाले .. आकांक्षाचे तिसरीपर्यंतचे शिक्षण आसगावमध्ये झाले. त्यांनतर इयता चौथी प्रज्ञाशोध परीक्षा , पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्येही हल्लारवाडी शाळेतून तसेच इयता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा कन्याशाळा चंदगड येथून तिची अव्वल क्रमांकाने निवड झाली.
स्पर्धा परीक्षेबरोबरच चित्रकलेची तिला विशेष आवड व कौशल्य आहे. आठवी शिष्यवृत्तीच्या यशासाठी त्यांच्या संजय गांधी विद्यालय नागनवाडीमधून यश मिळाले. के. डी . बारवेलकर, व्ही. बी. पाटील, मुख्याध्यापक एम. आर. भोगुलकर व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले . सातवी प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी पुजा तुपारे यांनी करून घेतली होती. आर. डी. पाटील यांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले. आकांक्षाचे वडील विश्वनाथ गावडे हे स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करत असल्याने मुलीच्या यशाने ते कृतार्थ झाले .
POSITIVVE WATCH TEAM तर्फे आकांक्षा विश्वनाथ गावडे हिचे विशेष अभिनंदन