शिराळा : येथील पंचायत समितीमध्ये आज तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर पिण्याच्या पाण्याच्या योजनांचा आढावा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी घेतला. तहसीलदार गणेश शिंदे व गट विकास अधिकारी संतोष राऊत प्रमुख उपस्थितीत होते. आमदार नाईक यांनी 85 योजनांचा आढावा घेतला.
या 85 योजनांसाठी 50 कोटी 60 लाख निधी मंजूर आहे. 79 योजनांना कार्यारंभ आदेश प्राप्त झाले. 22 योजनांची कामे भैतिकदृष्ट्या पूर्ण झाली आहेत. 54 योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. वीज वितरण कंपनीचे उप अभियंता प्रल्हाद बुचडे यांनी 35 गावातील योजनांसाठी नविन विद्युत जोडणीचे कामांचे तत्काळ सर्वेक्षण करुन अंदापत्रक सादर करावे.
गुणवत्तेबरोबर शारीरिक विकास देखील महत्वाचा-मानसिंगराव नाईक
तालुक्यात ज्या गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते व जेथे टँकने पाणी पूरवठा करवा लागतो त्या गावातील पाणी योजना ठेकेदार व ग्रामसेवकांनी पुढाकाराने प्राधान्याने पुर्ण कराव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रवीण तेली, शाखा अभियंता बाहुबली हुक्कीरे व साळुंखे तसेच सर्व कनिष्ठ अभियंता, विविध गावचे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, योजनांचे ठेकेदार, ग्रामसेवक उपस्थित होते.
राजकीय नेत्यांच्या या कार्यकर्तृत्वाच्या कामगिरीचे काैतुक