देशातील रोड अपघातात प्रत्येक तासाला 18 लोकांचा मृत्यू चिंताजनक बाब
देशात सध्याच्या परिस्थितीत रस्ते अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते.यामागे अनेक कारणे दिसून येतात. यात प्रशासनाचा व वाहनचालकांचा निष्काळजीपणा असे अनेक कारणे आपल्याला पाहायला मिळतात. देशात रस्ते अपघातांमध्ये प्रत्येक तासाला 18 लोकांचा मृत्यू होतो. ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.सन 2021 मध्ये देशात एकूण 4 लाख 12 हजार 432 रस्ते अपघात झालेत. यात 1लाख 53 हजार 972 लोकांना आपले प्राण गमवावे लागले तर 3 लाख 84 हजार 448 लोक जखमी झालेत. यामध्ये सरकारी आकडेवारीनुसार देशात एकूण 19748 सडक हादसे झालेत.यात ड्रायव्हिंग करतांना संतुलन न ठेवणे, मद्य प्राशन करून ड्रायव्हिंग करणे, वाहनचालवीतांना मोबाईलचा वापर करने इत्यादी अनेक कारणांमुळे अनेक दुर्घटना झाल्याचे दिसून आले.ही संपूर्ण आकडेवारी सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाच्या वार्षिक अहवालात नमूद केली आहे. वाहनचालवीतांना मोबाईल फोन वापरल्यामुळे सन 2021 मध्ये एकुण 1997 रस्ते अपघात झालेत.यामध्ये 1040 लोकांना आपले प्राण गमवावे लागले.हे सुध्दा अहवालात नमू
द केले आहे.म्हणजे मोबाईलचा जर आपण दुरूपयोग केला तर तो जिवावर केव्हाही बेतू शकतो ही बाब अहवालातुन लक्षात येते.अहवालावरून लक्षात येते की टू व्हीलरच्या दुर्घटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते.त्याचप्रमाणे पायदळ चालनारे सुध्दा जीव सुरक्षित नसल्याचे स्पष्ट दिसुन येते. 2021मध्ये सडक दुर्घटनामध्ये सर्वात जास्त 8506 मृत्यू उत्तर प्रदेशात झालीत.यानंतर तामिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान इत्यादी अनेक राज्याचा नंबर लागतो. देशात रस्ते अपघातांची संख्या व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ही अत्यंत गंभीर बाब आहे.राज्यात दिवसेंदिवस रस्ते अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते ही अत्यंत दुखदायी बाब आहे.रोडचे खड्डे, रोडचे बांधकाम यामुळे सर्वसामान्यांना आवागमन करण्यास मोठी अडचण निर्माण होते.त्याचप्रमाणे रोडचे काम सुरू असताना वनवे ट्राफीक असते अशाच ठिकाणी अपघाताचे प्रमाण जास्त दिसून येते.कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या कामानिमित्त किंवा नौकरीवर जात असतो.परंतु वाढते रोडचे अपघात पहाता प्रत्येकामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होने सहाजिकच आहे.यावरून स्पष्ट होते की घरून निघालेला व्यक्ती वापस घरी सुखरूप पोहचेलच याची काहीही गॅरंटी नसते ही बाब सध्याच्या होणाऱ्या अपघातावरून लक्षात येते.कोणताही अपघात असो यात एकालाच दोष देता येणार नाही.वाहन चालकांनी आपल्या वाहनांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे असते.त्याचप्रमाणे घरून निघताना हेल्मेट घालुनच निघायला हवे व चारचाकी वाहनचालकांनी सिटबेल्टचा वापर करावा.कारण कोणताही अपघात सांगुन येत नाही.त्यामुळे या धकाधकीच्या जीवनात स्वतःचा जीव स्वतःलाच सांभाळायचा आहे.वाहन चालवितांना दुचाकी असो अथवा चारचाकी असो आपल्या वाहणाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
राज्य सरकारने इतर समाजाप्रमाणे कलार समाजातील युवकांसाठी विकास योजना अमलात आणावी
सरकारने व वाहतूक प्रशासनाने दुर्घनांच्या ठिकाणी जातीने लक्ष देण्याची गरज आहे.रोडचे अपघात रोखण्यासाठी सरकार, प्रशासना व नागरिक यांच्यात समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे.त्याचप्रमाणे वाहतुकीच्या बाबतीत सरकारने किंवा वाहतूक प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तीतकेच अती आवश्यक आहे.कारण “जान है तो जहान है” हा मुलमंत्र सर्वांनीच अंगीकारला पाहिजे.परंतु देशातील व राज्यातील अनेक भागात टिप्पर,ट्रक चालकांच्या व इतर वाहनचालक यांच्या निष्काळजीपणामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.अपघातांचे उदाहरण द्यायचे झाले तर सरकारी आकड्यानुसार भंडारा जिल्ह्यात जानेवारी 2022 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत एकुण 426 अपघात झालेत या अपघातात 154 लोकांचा मृत्यू झाला व 216 गंभीर जखमी झालेत आणि इतर किरकोळ जखमी झाले असे अहवालात म्हटले आहे.अशी अपघातांची भयावह परिस्थितीत एकट्या भंडारा जिल्ह्याची आहे तर महाराष्ट्रासह देशात काय गंभीर परिस्थिती असेल हे आपण समजू शकतो. म्हणजेच अपघातांची वाढती संख्या अत्यंत चिंताजनक व धोकादायक स्थितीत असल्याचे दिसून येते.त्यामुळे वाढते अपघात रोखण्यासाठी नागरिकांनी सामोरं येण्याची गरज आहे.
अन्यथा राष्ट्रपती राजवटच याेग्य! राज्य म्हणजे राजकीय पुढाऱ्यांची जागीर नव्हे!
याकरिता आपण सर्वांनी सर्वप्रथम वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.वाहन चालवितांना मुख्यत्वे करून मोबाईलचा वापर करूच नये व कोणताही सिग्नल जंप करू नये किंवा तोडू नये.त्याचप्रमाणे आपल्या वाहनांचे हॉर्न, ब्रेक,इंडीगेटर सदैव व्यवस्थीत(ओके)असायला हवे व यांचा योग्यवेळी वापर व्हायलाच हवा जेनेकरून अपघात रोखण्यास मोठी मदत होईल.वाढते रस्ते अपघात पहाता सर्वांनाच माझी विनंती आहे की वाहन चालवितांना नेहमीच सतर्कता बाळगावी.