परराज्यातील वनक्षेत्रपालाना बामणोलीत प्रशिक्षण
शिराळा (जी.जी.पाटील)
कर्नाटक स्टेट फॉरेस्ट अकादमीचे सेन्ट्रल इंडिया टूर प्रोग्रॅम अंतर्गत अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश चे 34 प्रशिक्षणार्थी वनक्षेत्रपाल यांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वनपरिक्षेत्र बामणोली येथे प्रशिक्षण देण्यात आले. परराज्यातील हे वनक्षेत्रपाल बामणोलीत प्रशिक्षणासाठी आल्याने येथील समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडत आहे.
यावेळी मा क्षेत्रसंचालक तथा वनसंरक्षक नानासाहेब लडकत व उपसंचालक उत्तम सावंत सुचनांप्रमाणे सर्व प्रशिक्षणार्थी याना स्वर्गीय मा. ग. गोगटे सभागृहामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे भौगोलिक व प्रशासकीय रचना, जैवविविधता, जागतिक वारसा म्हणून असलेले महत्व, निसर्ग पर्यटन व्यवस्थापन, लोकसहभाग, मानव वन्यजीव संघर्ष ,जनजागृती आदी विषयांचे सादरीकरण व माहिती वन्यजीव बामणोली वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबणीस यांनी प्रशिक्षणार्थांना करून दिली.
बिनविराेध निवड…सोनवडेत सर्जेराव पाटील उपसरपंच
खिरखिंडी नियतक्षेत्रातील संरक्षण कुटी व निरीक्षण मनोरा येथे क्षेत्र भेटी दरम्यान संरक्षण कुटी वरील कामकाज, विविध रजिस्टर्स ( PIP, MSTRIPES व इतर) mstripes गस्ती , वणवा व्यवस्थापन विषयी माहिती देण्यात आली व त्या नंतर नियतक्षेत्रात फिरती दरम्यान गस्ती पायवाट देखभाल, कुरण विकास काम, PIP , कॅमेरा trapping , transact line इ बाबी दाखवण्यात आल्या व त्याविषयी माहिती सांगण्यात आली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प भेटीदरम्यान कुरण विकास, PIP व इतर बाबीविषयी नव्याने माहिती मिळाल्याचे प्रशिक्षणार्थी यांनी अभिप्राय देतेवेळी नमूद केले. यावेळी त्यांच्यासोबत असणारे instructor नायक सर RFO व भारत सर यांनी देखील समाधान व्यक्त केले.