![]() |
|
कोल्हापूर ते मिरज लोकल रेल्वे सुरू करा अन्यथा आंदोलन करू….. काेल्हापूरः काेराेना नंतर काेल्हापूर- मिरज ही बहुउपयाेगी व प्रवाशांच्या दृष्टीने तसेच असंख्य कामगारांच्या साेयीची असलेली रेल्वे बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे दरराेज हजाराे प्रवाशांची गैरसाेय तसेच आर्थिकृष्ट्या हाल हाेत आहे. त्यामुळे ही लाेकल, पँसेजर रेल्वे पुन्हा पूर्ववत सुरु करावी, या आशायाचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य असंघटित क्षेत्र कामगार यांच्यावतीने काेल्हापूर येथील रेल्वे प्रशासन तसेच स्टेशन मास्तर विजयकुमार यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्य असंघटित क्षेत्र कामगार संघटना जिल्हा कोल्हापूरच्या वतीने साेमवारी संस्थापक अध्यक्ष अंजुम देसाई यांच्या आदेशाने . कोल्हापूर मधील स्टेशन प्रबंधक विजयकुमार यांना हे निवेदन देण्यात आले. यामध्ये गांधीनगर येथे ये जा करणाऱ्या सर्व रेल्वेचा थांबा पूर्ववत सुरु करावा. गांधीनगर येथे अनेक व्यवसायांची नांदी आहे. गांधीनगर मधील या सर्व व्यवसायाकडे कोल्हापूर, जिल्ह्यातील जयसिंगपूर, हातकणंगले ,आळते ,इचलकरंजी, तसेच मिरज, सांगली या भागातून अनेक कामगार नोकरी व दैनंदिन कामाकरिता येतात. येण्याकरता मार्गावरून पूर्वीच्या गांधीनगर थांबा बंद केल्याने कामगारांची गैरसोय होत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. या बातम्या देखील जास्त वाचल्या गेल्या… धबधबा पाहिला… दहा हजार लागले भरायला! हत्तींचा वावर रोखा,उपाययोजना करा;आजरा-चंदगड मधील मानवी वस्तीतील धाेका टाळा – सतेज पाटील |































