पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
पुणे विभागातील तळेगाव, आकुर्डी व कोल्हापूर शाळांचा समावेश
काेल्हापुरला संधी मिळणार का?
रेल्वेने जारी केलेले हेच ते पत्र
काेल्हापूरः आपल्या भारताचे पंतप्रधान आता ६ आँगस्टला थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पहिली ते दहावी पर्यंतच्या काेणत्याही विद्यार्थाशी ते हितगूज करणार आहेत. पण त्याआधी मुलांनी रेल्वेविषयी चांगले चित्र काढून दाखवायचे आहे. एकादा सुंदरसा निबंध लिहावयाचा आहे.रेल्वेमध्ये आता झालेले परिवरर्तन आणि रेल्वे मध्ये अजून काेणत्या व कशा प्रकारच्या सुधारणा पाहिजेत, यावर मुलांनी आपली मत मांडयाची आहे, निबंध व चित्रकलेच्या माध्यमातून. यासंबंधी अनेक शाळांना, मुख्याध्यापकांना पत्र पाठविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहेत. दि. १ ते ६ आँगस्ट दरम्यान ही स्पर्धा घेतली जाणार आहे. त्यानंतरच काेणत्याही शाळेतील विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद माेदी संवाद साधतील.
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत 6 ऑगस्ट रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे विभागातील तळेगाव, आकुर्डी व कोल्हापूर मधे समाविष्ट विद्यार्थ्यांशी ‘ऑनलाईन संवाद ‘ साधणार आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत होणार्या समारंभात विद्यार्थ्यांचा सहभाग व उपस्थिती महत्वाची असणार आहे.पंतप्रधानांसह हाेणाऱ्या या ऑनलाईन संवादासाठी विद्यार्थ्यांची निवड आपल्या शाळेत 1ऑगस्ट रोजी पासून होणार्या चित्रकला व निबंध स्पर्धेद्वारे केली जाईल.
निबंधासाठी यातील एक विषय निवडता येईल.
1) अमृत भारत स्टेशन योजना 2)भारतीय रेल्वे मधे झालेल्या सुधारणा 3)75व्या वर्षातील शक्तीशाली भारताची माझी संकल्पना 4)1947 पासून राष्ट्र उभारणीतील रेल्वेची भूमिका 5)वैभवशाली 75 व्या वर्षातील भारताची विकासाकडे होणारी वाटचाल
चित्रकलेसाठी खालील विषयातून कोणताही एक विषय निवडता येईल
1) अमृत भारत स्टेशन- कल्पनाचित्र 2)भारतीय रेल्वे स्टेशनचे होणारे परिवर्तन 3)अमृत भारत स्टेशनचे महत्त्व 4)अमृत भारत स्टेशनचा प्रवाशावरिल परीणाम 5) माझी आवडती ट्रेन.
या स्पर्धा गट1-ईयत्ता 1ली ते 5वीमध्ये व गट 2-ईयत्ता 9वी ते 12वी अशी घेण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी लागणारे साहित्य रेल्वे प्रशासनामार्फत पुरवले जाईल. आपणास विनंती की रेल्वे प्रशासनासह समन्वय साधून वरिल स्पर्धेचे आयोजन करावे व 6ऑगस्ट रोजीच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे. ज्या शाळांमधे NCC व NSS चे विद्यार्थी आहेत त्यांना समारंभासाठी पाठवता येईल. कार्यक्रमाचा ईतर तपशील योग्य वेळी उपलब्ध केला जाईल. कृपया तातडीने दखल घ्यावी.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.