‘ तारीफ अपने आप की
करना फ़िजूल है,
खुशबू खुद बता देती है
कौनसा फुल है।’
गुलजारांच्या या ओळी जा आठवाव्यात? म्हणून गाडी थांबवली. थोडा मागे गेलो. लक्षात आलं की, लांब लचक एका ओळीत, परेडला सैनिक उभा रहावेत असे ही
‘ शंकसुराची ‘ झाडं उभी आहेत. पण ती सावधान मध्ये वैगेरे अशी काही नव्हती. मनसोक्त वाऱ्याच्या झुळकी बरोबर झुलत होती. त्यांच ते अंगावर उष्ण रंगसंगतीचे रंग घेऊन झुलनच मनाला भावलं होतं आणि गुलजार आठवले होते.
मग काय! छान पैकी काही वेळ त्यांच्या सान्निध्यात घालविला.मनमोकळ्या गप्पा झाल्या. परत कधी या भागात येईन, नाही येईन या विचाराने आठवण म्हणून या सगळ्या मित्रांचे चार फोटोही काढले. बघा… तुम्हालाही मैत्री करायला आवडेल.
सुंदरता निसर्गांची.. आकर्षण फुलांचे- मिलींद यादव यांच्याच नजरेतून आकर्षक छायाचित्र पहा
पर्यटनः वेळणेश्वरचे सौंदर्य — श्री धोपेश्वर नयनरम्य परिसर शाहुवाडीच रांगड सौंदर्य