रांगड सौंदर्य शाहुवाडीच भाग चौथा
श्री क्षेत्र धोपेश्वर….व श्री क्षेत्र जुना धोपेश्वर
शब्दांकन शिराळा (जी.जी.पाटील)
आमच्या रांगड्या मातीतल्या रांगड्या शाहूवाडीला लाभलेला २० हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्राचा लाभलेला जंगली भाग हाच आमच्या पर्यटनाचा महत्त्वाचा मुद्दा आहे.येथल जंगलही तसच विविध जैव विवधतेने नटलेले,रमणिय आहे.आज आपण जात आहोत,तालूक्याचा धार्मिक वारसा जपणार श्री क्षेत्र धोपेश्वर ला.मलकापूर ते आंबा मार्गावर मलकापूर पासून पुढे गेले की निळे गाव त्यानंतर पुढे वालूर फाटा लागतो.डाव्या बाजूला एक फाटा तसाच डावीकडे वालूर गावाकडे तर उजव्या बाजूला धोपेश्वर कडे जातो.फाट्यातून थोडे आत आले की समोर हिरवागार डोंगर दिसू लागतो तो हाच धोपेश्वरचा डोंगर.दाट झाडीमध्ये धोपेश्वर लक्ष वेधून घेतो.आसपासचा निसर्ग रम्य जंगलाचा परीसर,अप्रतीम व नयनमनोहर आहे.
सुरुवातीलाच विठलाई मंदिर वलागते.तसच पुढे धोपेश्वर चे मंदिर आहे.सद्या मंदीर जरी बाहेरुन नव्या ढाचणीचे बांधले असले तरी आत ढाचा जुन्या बांधनीचाच आहे.बाहेर आकर्षक नंदी शंभू महादेवाची पिंड व विठलाई देवीची मूर्ती आहे.मंदिराच्या बाजूलाच पाठीमागे काळ्या पाषाणातून बारमाही पाणी झिरपत असते.हे पाणी एका टाकीत साठवले जाते.पावसाळ्यात तर येथील निसर्ग सौंदर्य बेफाम असते.महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते.तालूक्याचा वारसा जपणारे हे ठिकाण जिल्ह्यात सीतेच्या अशोकाची कांही जी मोजकी झाडे आहेत त्यातली कांही झाडे धोपेश्वर डोंगरावर आढळतात.राज्याचे मानचिन्ह,असलेले जारुळ ताम्हण फुल येथे बघावयास मिळते.
धोपेश्वरपासून वरती तसच गेले की जुना धोपेश्वर कडे जाता येते.मुसलमानवाडी व हिंडाल्को बॉक्साईट पासून वर पठारावर जुन्या धोपेश्वराचे मंदिर आहे.वरती एक पाण्याचे तळे आहे.सभोवताली घनदाट जंगल आहे.निसर्गरम्य असा परिसर आहे.
आम्ही स्वराज्य प्रतिष्ठान व युगंधर फिल्म ने धोपेश्वरचा माहीती,पटाचा व्हिडीओ सुद्धा प्रदर्शित केला आहे.आम्ही येथे सातत्याने स्वच्छता व संवर्धन मोहीमा राबवतो.
अशाच एका रमणीय सकाळी आमच्या,श्री धोपेश्वर मंदिराला व जुना धोपेश्वर नक्कीच भेट द्या.
याआधीच्या लिंक वाचण्यासाठी निळ्या लिंकवर क्लिक कराः नक्की वाचा… रांगड्या शाहुवाडीचे दर्शन! धार्मिक शक्ती पीठ-आई जुगाई देवी व लोळजाई देवी
लेखक- डॉ.झुंझार माने, स्वराज्य प्रतिष्ठान
युगंधर फिल्म प्रोडक्शन
९८८१९८१०७३