शब्दांकन ( जी.जी.पाटील)
रांगड्या शाहूवाडीला धार्मिक शक्ती पीठांचा वंदनिय असा धार्मिक वारसा लाभला आहे.मोठ्या भक्ती भावाने भक्तगण आपल्या देवतांच्या यात्रा साजऱ्या करतात.आई उदगिरी , साताळी, धोपेश्वर, निनाई,पावडाई,नवलाई,मळाई ,व इतर देव -देवता तालुक्याचा धार्मिक वारसा लाभला आहे.शाहूवाडी तालूक्यातील धार्मिक वारसा येळवण जुगाई येथिल आई जुगाईदेवी व लोळजाई देवी येळवण जुगाई ला मलकापुर मधून साधारणतः १३ कि.मी पांढरेपाणी मार्गाने, कोल्हापूरहून बाजारभोगाव-करंजफेण व मांजरे मधून येता येते तर कोकणातून पाचल मार्गाने अणुस्कुरा घाटातून मांजरेमधून येता येते.
देवीच्या यात्रेनिमित्त मोठ्या भक्तीगावाने राज्यातील अनेक भागातून भक्तगण येतात भक्तीरसात न्हावून जातात.उत्सवाच्या दिवशी पालखीचा मान येथिल वरेकर(गवळी) समाजाला तर आरती,ढोल,ताशा व वाद्य वाजवायचा मान म्हालदार मंडळींना आहे.देवीच्या पालखीच्या उत्सवासाठी मिरज,टोप,इस्लामपूर,माण, मोळवडे,थेरगाव,नांदगाव आदी भागातून आलेल्या सासनकाठ्यांनी मिरवणूक काढली जाते.विविध गावातून आलेल्या सासनकाठ्यांची मिरवणूक काढली जाते.यात्रे दिवशी गोडा नैवेद्य आसतो.
याआधीचे भाग वाचण्यासाठी या निळ्या लिंकवर क्लिक करा– नक्की वाचा; वाचकांसाठी स्पेशल! रांगड सौंदर्य शाहुवाडीचं………. पालेश्वर धरणाचा सौंदर्याचा साज काय येगळाच
देवीच्या दारात महाराष्ट्रसह कर्नाटक व कोकणातील हजारो भक्त भाविक येतात. श्री जोतीबा देव यांची जुगाईदेवी बहीण असल्याने दोन्ही दैवतांची यात्रा एकाच दिवशी भरते.नेहमी एकाच दिवशी ही यात्रा भरते.श्री जुगाई देवीचे पुजारी आख्यायिका सांगतात की जुगाईदेवीचे मूळ स्थान मराठवाड्यातील आंबेजोगाई आहे.जुगाईदेवी कर्नाटकातून पन्हाळा मार्गाने येत असताना श्री जोतीबा या ठिकाणी आल्यानंतर जोतिबा रायांनी सल्ला दिला की माझ्या उजव्या बाजूला घनदाट जंगल आहे.कासारी नदीच्या उगमाजवळ तुझे वास्तव्य व्हावे.जोतीबांना भाऊ मानून एक वचन मागितले .जोतीबांनी वचन दिले.चैत्र पौर्णिमेला एकाच दिवशी दोघांची यात्रा भरते.श्री जोतीबांचे आवडते रत्न दवणां यात्रेदिवशी श्री जुगाई मंदिरा पर्यंत पोहोच केले जाते.मंदिराच्या भोवती पाच प्रदक्षिणा होतात व देवी गाभाऱ्यात स्थानपन्न होते.
- आई लोळजाई देवी—अनादी काळापासून घनदाट जंगल,नदी काठावरती भंडारवाडी.येळवण जुगाईच्या मध्यभागी देवीने वास्तव्य केले आहे.आई लोळजाईची यात्रा सुद्धा चैत्र पौर्णिमेला भरते.या देवीला बारा थळांची मालकीण अस म्हणतात .बारा गावातील तंदे व वाद देवीच्या दारात मिटतात.देवीच्या पुजेचा मान गुरववाडी येथिल गुरव समाजाला आहे.
- सगळे भक्त गण गुलालात न्हावून निघतात.सर्वांच्या भक्तीला देवी पावते.मंदिर परिसरात भक्तीचा पूर येतो.मंदिराच्या दारातच जुनी बारव (विहीर)आहे.सुंदर काम व देवीचे देखणं मंदिर आहे.
बांबवडे-पैजारवाडी ग्रुप तर्फे दरवर्षी येथे अन्नछत्र दिवसभर सुरु असते. तहसिल विभाग ,पंचायत समिती, परिवहन विभाग ,आरोग्य विभाग ,वन विभाग पोलीस विभाग व विद्युत विभाग मार्फत सर्व व्यवस्था करणेत येते.देवीच्या दारात भक्तीरसाचा महापूर येतो.नेहमी स्वच्छता व संवर्धन मोहीमा राबवून हा धार्मिक वारसा जपूया.
याआधीचे भाग वाचण्यासाठी या निळ्या लिंकवर क्लिक करा- नक्की वाचा….वाचकांसाठी स्पेशल- भाग २ – रांगड सौंदर्य शाहुवाडीचं! निसर्ग सौंदर्याचा देखणा साज निनाई परळे धरण
डॉ.झुंझार माने
स्वराज्य प्रतिष्ठान
युगंधर फिल्म प्रोडक्शन
शाहूवाडी
९८८१९८१०७३
🚩🚩🚩🚩🚩🚩
जाता जाता हे पण आर्टिकल वाचाः चंदिगडला जाताय… तर हा अविस्मरणीय प्रसंग वाचा! चंदिगड अमृतसर वाघा बॉर्डर सिमला दिल्ली सहलीतील या २०१९ च्या आठवणी