शिक्षकेतर कर्मचा-यांचा पुण्यात १३ फेब्रुवारी ला महाआक्रोश मोर्चा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

शिराळा(जी.जी.पाटील)

राज्यातील शिक्षकेतरकर्मचाऱ्यांच्या विविध न्याय हक्काच्या मागण्या संदर्भात १३ फेब्रुवारी रोजी पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयावर महाआक्रोश मोर्चाकाढला जाणार आहे.

या मोर्चात राज्यभरातील शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार असून, सांगली जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षकेतर महामंडळाचे राज्य अध्यक्ष अनिल माने, सरकार्यवाह शिवाजीरावखांडेकर, जिल्हाध्यक्ष मकरंद कुलकर्णी व कार्यवाह शैलेश गोंधळे यांनी केले आहे.

पक्षी निरीक्षणात नोंदवल्या ४५ पेक्षा जास्त पक्षी प्रजाती…शिराळामध्ये जागतिक पाणथळ दिवस

माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकेतर संघटनेच्या वतीने राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी पुणे येथील शनिवार वाडा ते शिक्षण आयुक्त कार्यालय असा महाआक्रोश मोर्चा काढणार आहेत.

      प्रमुख मागण्या

१.शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दहा, वीस,तीस लाभांची योजना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करावी.
२.शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीस त्वरित परवानगी देण्यात यावी.
३.जुनी पेन्शन योजना लागू करावी.
४.न्यायालयीन निर्णयानुसार माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २४ वर्षांनंतर दुसरा लाभ मंजूर करावा.
५.अनुकंपा नियुक्तीवरील मान्यता तत्काळ देण्यात याव्यात.
६. सरेंडर रजेचा लाभ पूर्वीप्रमाणे ग्राह्य धरावा .
७. अर्जित रजा साठविण्याची कमाल मर्यादा काढून टाकावी.
८.विधान परिषदेतील शिक्षक आमदारांना मतदान करण्याचा
अधिकार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना
देण्यात यावा.
यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला जाणार आहे. या महा आक्रोश मोर्चात सांगली जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचा-यानी सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मकरंद कुलकर्णी व कार्यवाह शैलेश गोंधळे यानी केले आहे.

नक्की वाचा… रांगड्या शाहुवाडीचे दर्शन! धार्मिक शक्ती पीठ-आई जुगाई देवी व लोळजाई देवी

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.