आरळा येथील उमेद व संघर्ष ग्रामसंघाच्यावतीने हळदी-कुंकू व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात
शिराळा (जी.जी.पाटील)
आरळा ता.शिराळा येथे उमेद ग्रामसंघ व संघर्ष ग्रामसंघाच्यावतीने हळदी-कुंकू व विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.महाजन गॕस एजंन्सीच्या सुखदा महाजन,साधना पाटील,आरळा गावच्या लोकनियुक्त सरपंच बाळाबाई धामणकर, सोनवडे गावच्या लोकनियुक्त सरपंच सोनाली नाईक, केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी,सुधिर बंडगर,संदीप चव्हाण,बाबासो बेरडे,शामराव निर्मळ याच्या शुभ हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी सुखदा महाजन होत्या.
या हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी आरळा पंचक्रोशीतील सुमारे तिनशे महीलांनी हजेरी लावली होती.सर्वप्रथम मान्यवरांचा शाल,श्रीफळ,गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संदीप चव्हाण, साधना पाटील, सुखदा महाजन, सुधिर बडगर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.यावेळी लहान मुलींनी रेकाॕर्ड डांन्सचे सादरीकरण केले.यावेळी महाजन गॕस एजंन्सीच्या सुखदा महाजन यांनी गॕस विषयी महीलांना प्रात्यक्षिकासह माहीती दिली.या कार्यक्रमासाठी समाजसेवक शंकरदादा मोहीते यांनी आर्थीक मदत करुन सहकार्य केले.
कार्यक्रमाचे आयोजन माजी सरपंच निलोफर डांगे,विश्वासच्या संचालिका अनिता चौगुले, मनिषा कुंभार,सरिता पाटील,सविता भाष्टे,अर्चना कांदेकर,सुनंदा कुंभार यांनी केले होते.यावेळी प्रकाश धामणकर, कोंडीबा चौगुले,ज्योती आमले,सोनाली शिरंबेकर,अनिता कांबळे,संगीता पाटील,अश्वीनी कुंभार तसेच वाडी वस्तीवरील महीला मोठया संख्येने उपस्थीत होत्या.कार्यक्रमाचे सुञसंचालन माधुरी कुंभार यांनी केले तर आभार निलोफर डांगे यांनी मानले.