WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

चंदिगडला जाताय… तर हा अविस्मरणीय प्रसंग वाचा! चंदिगड अमृतसर वाघा बॉर्डर सिमला दिल्ली सहलीतील या २०१९ च्या आठवणी

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

वृत्तांकन- टीम लिडर- राजेंद्र वाडकर

१ फेब्रुवारी २०१५ रोजी झालेला पुलवामा हल्ला स्थामध्ये शहीद झालेले C.R.P.F ४२ जवान त्यामुळे देशभरामध्ये उफाळून आलेली संतापाची लाट आणि चालाकीट येथे हवाई दलाने दिलेले प्रत्युत्तर या सगळ्या गोष्टीच्या साक्षीनेच आमची चंदिगड सहलीची सवारी चालली होती. देशभरामध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता. चंदिगड, अमृत- सरलेला श्रीनगर विमान बंद ठेवण्यात आली होती. आणि तिकडेच आमची सहल जाणार होती. प्रत्येकाच्या मनामध्ये भितीने थैमान मांडले होते. अशा भितीदायक वातावरणामध्येच आम्ही २७ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० ला घरातून मिरजेला जाण्यास बाहेर पडलो आणि रात्री ११.५० च्या रेल्वेने मिरजेला १.०० वाजता पोहचलो. मिरज रेल्वे स्टेशनवर २ तासांची विश्रांती घेउन २८ तारखेला पहाटे २० ला आम्ही चंदिगडला मिरजहून रेल्वेने प्रयाण केले.

आमची ७ जणांची टीम होती. टीम लिडर राजेंद्र बाडकर यांनी सहलीच नेतृत्व स्वीकारल हाेते. लक्ष्मण गिलबिले यांनी प्रवासातील खर्चाच्या हिशोबाची जबाबदारी स्वीकारली होती. कल्पना वाडकर  वैशाली देसाई.  गीता पाटील, विजय पाटील, गणपत देसाई हे आमच्या टीममधील इतर सदस्य होते. मिरज ते चंदिगड या ४० तासाच्या प्रवासामध्ये   पुणे निजामुदिन आग्रा झाशी ग्वाल्हेर शहाबाद: दिल्ली कुरुक्षेत्र अंबाला इ. रेल्वे स्टेशन लागली वाटेत दोन्ही बाजुला नजर पोहचत नाही तिथपर्यंत मोहरीची हिरवीगार शेती पसरलेली होती जणू वसुंधरेने हिरवा शालू परिधान केला आहे. मधुनी आणि बाळीची उंच-उंच झाडे स्वामीयामध्ये आणची भर घालत होती. या ४० तासांच्या प्रवासामध्ये आम्ही माैज-मजा गमती-जमती दंगा-मस्ती तसेच आमच्या टीम लिडरकडून जजमेंट Judgement.हा पत्त्याचा नवीन डाव शिकण्यास मिळाला. अशा पद्धतीने रेल्वे प्रवासाचा आनंद लुटत आम्ही १ मार्च २०१९ च्या संध्याकाळी ६.१५ ला चंदिगड रेल्वे स्टेशनवर पोहचलो. स्टेशनवर पाय ठेवताच पक्षांच्या किलबिलाटाने आमचे स्वागत झाले. ते पक्षांचे थवे जणु आम्हाला म्हणत होते कि चंदिगड शहरामध्ये तुमचे स्वागत आहे. या शहरामध्ये आम्ही तुम्हाला कशाचीही उणीव भासू देणार नाही..

आमच्या टीमचे लिडर राजेंद्र वाडकर यांचा भाचा आणि त्याचे सहकारी आम्हाला नेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आले होते. आम्ही स्टेशनमधून बाहेर पडलो आणि समोर मामा – भाच्याची झालेली गळाभेट पाहुन गहिवरून गेलो. कुठतरी अजुन नात्याची गुंफण सुरक्षित आहे हे पाहुन आम्हाला समाधान वाटले. अशा गहिवरलेल्या वातावरणातच तीन जिमी- गाडयामधुन HQ N-Area च्या मुख्यालयात मुक्कामी पोहचलो तेथे पोहचल्यानंतर आमच्या नातेवाईकांनी केलेल्या स्वागताने आमचा ४० तासांचा प्रवासाचा कंटाळा कुठल्या- कुठे निघुन गेला कळाल नाही आणि आम्ही सर्वजण एकाच कुटूंबातील सदस्य आहोत असे बाटू लागले. रात्री जेवण झाल्यावर आम्ही आमच्या विश्रांती गृहाकडे परतला.

चंदिगडमध्ये पोहचल्यानंतर तेथील आमचा जो काही प्रवास ठरलेला होता म्हणजेच – अमृतसर दर्शन • बाघा बार्डर दिल्ली दर्जन सिमना दर्शन यासाठी आम्ही खाजगी इनोव्हा- C घाडी भाडयाने दबलेली होती आणि त्या गाडी चालकांचे नांव होत ‘प्रतिक’.२ मार्चला सकाळी वाजता आम्ही अमृतसर दर्शन करण्यास निघालो. अमृतसरमध्ये भव्य-दिव्य असे मुवर्णमंदिर आणि जालीयनवाला बाग पाहिली जालीयनवाला बागमध्य “जालीयनवाला हत्याकाडावेळी ज्या-ज्या ठिकाणी गोळ्या मारलेल्या होत्या त्या ठिकाणी गुणा पाहिल्या वाटेत ‘सरहद’ चाबा पथे दुपारचे जेवण करून २ वाजता बाघा बार्डर येथे पोहचलो. बाघा बॉर्डर येथे आमचे पावसाने स्वागत केले. पाऊस जगु आम्हाला सांगत होता- येथील वातावरण अगदी शांत आहे तुम्ही अजिबात घाबरू नका. आपल्या देशाचे जवान आपल्या भारत मातेच रक्षण करण्यासाठी सज्ज आहेत…

पुलवामा हल्ल्यातील I.A.F. विंग कमांडर ‘अभिनंदन’ याना पाकिस्तानने । मार्च २०१९ रात्री ९.१५ वाजता याचा वॉर्डर येथून भारतात सोडले होते. आणि आम्ही मार्चच्या संध्याकाळचा परेड सोहळा पहाण्यासाठी तेथे गेलो होतो. चोख व्यवस्था सिक्य- रिटी बंदोवस्त आणि आधारकार्डांच्या आधारे केलेल्या प्रवेशाच्या पूर्व नियोजनाच्या आधारे आमी दुपारी ३ वाजता तिरंगा हातात घेउन स्टेडियममध्ये प्रवेश केला ‘VIP पास मिळा त्यामुळे आमची बसण्याची व्यवस्था अगदी समोरच्या रांगेत झाली होती. आत गेल्यानंतर देशभक्तीपर गाणी ऐकुन आम्हाला स्फुरण चढले. देशप्रेम माणजे काय हे आमची जणांची टीम तेथे प्रत्यक्षात पावसात ओलाचिंब होउन अनुभवत होती. भारत माता कि जय वंदे मातरम ‘च्या घोषणांनी संपुर्ण परिसर देशप्रेमी झाला होता.

संध्याकाळी ५ वाजता संचनाला सुरुवात झाली. B.S.F. चे जवान आपल्या संचलनाने उपस्थित भारतीयांमध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण करीत होते तर दुस-या बाजुला पाकिस्तानच्या हद्दीत त्याचा संचलन सोहळा चालला होता. पाऊस काही थांबायचे नांव काढत नव्हता. तेथील जवानांचा उत्साह आम्हाला हेच सांगत होता कि आम्ही एकाही जवानांच बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असा तो उत्साहवर्धक नयनरम्य अविस्मरणिय परेड सोहळा डोळयांच्या पापण्या न हलवता आमच्या डोळ्यामध्ये साठवत होतो. पाऊस काही थांबायचे नांव काढत नव्हता शेवटी पावसाच्या साक्षीनेच तिरंगा खाली उतरवला आणि त्या सोहळ्याची सांगता झाली. आम्ही सर्वांनीच पावसामध्ये आणि देशप्रेमामध्ये ओलचित्र होउन भारत मातेला नमन केले. आणि परतिच्या मार्गाला लागलो. रात्री हवेली धाव्यावर जेवण करून राजेशाही घराण्यातील हनीचा अनुभव घेतला आणि चंदिगडला परत निघालो.

आपल्या देशाचे जवान २४ तास डोळयामध्ये तेल घालून आपल्या देशाचे रक्षण करतात त्या जवानांना आमचे कोटी कोटी- दंडवत.

३ मार्चला आम्ही दोन जिप्सी गाडया व दोन जवानांच्या सहाय्याने चंदगड दर्शन केले. चंदिगडमध्ये आम्ही रोज गार्डन रॉक गार्डन- सुकना लक पाहिले. दुपारी त्या जवानांच्या बरी बरच जेवण केले. चंदिगड शहराची रचना सेक्टरमध्ये केली आहे. संध्याकाळी आम्ही भाषा शाँपींगचा आनंद लुटला काही मान फिरले आणि संध्याकाळी आमच्या मुक्कामी ‘ऑफीसर्स पार्टी’ च्या ठिकाणी जेवणावर ताव मारला व ऑफीसच्या जीवनाचा अनुभव घेतला. तेथील बागे मधील डेलियाच्या आणि झेंडूच्या फुलाचे वेगवेगळे प्रकार पाहून आमची मने आनंदित झाली. रात्री विश्रांतीगृहामध्ये विश्रांती घडन आम्ही ४ मार्चला सिमला दर्शन करण्यास निघालो.

सिमल्याला जाताना द-या खो-याचा आणि घाट वळणाचा रस्ता लागला. दोन्ही बाजू- ला उंच डोंगर आणि सखोल द-या होत्या. ४ मार्चला महाशिवरात्र असल्यामुळे आम्ही वाटेत एका महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाचे दर्शन घेतले व सिमल्याकडे जाण्यास निघालो. सिम- ल्यामध्ये आमचे हिमवर्षावाने स्वागत झाले. सिमल्यातील कुफरी येथे जाताना आम्ही घोडया- वरून प्रवास केला. घोड्यावरून जाताना तो द-याखो-यामधील अरूंद रस्ता पाहून भिती वाटत होती. परंतु आम्ही जेव्हा तेथे पोहचलो तेव्हा तेथील बफ वर्षाव आणि वफाचे डोंगर पाहुन आमची भिती कुठे पळुन गेली कळलेसुध्दा नाही. सगळीकडे बर्फच बर्फ पसरलेला होता जणू डोंगर द-या पांढ-याशुभ्र शालीचे पांघरून घेउन झोपलेल्या आहेत. त्यातुन सुखची उंच उंच झाड आपालं डोक बाहेर काढून सगळ्या पर्यटकाना शुभेच्छा देत आहेत. आम्ही- त्या बर्फाच्छादित निसग सोदयांचा मनसापक्त आनंद लुटला. बर्फवर्षाव होत असतानाच बाफाळलेल्या चहाचा आस्वाद घेतला. घसरगुडी कली माक वर बसुन फोटो काढले तेथील त्या वफाच्छादित द-याखो-याच सौंदर्य डोळ्यात साठवुन माघारी यपण्यासाठी घोडयावरून परत प्रवास सुरू केला आणि काय आश्चर्य वरून खाली येईपर्यंत परत हिमवर्षाय अवर्णनिय असे ते दृश्य डोळयात साठवुन मॉल रोडवरती थोडी खरेदी केली. त्यानंतर सिम- तील ब्रिटीशकालीन चच पाहिले आणि काश्मीरी वेशात फोटो काढून आम्ही सोलनमध्ये येउन मुक्काम केला. सिमल्यामध्ये १९९३ नंतर पहिल्यांदाच एवढा हिमवर्षाव झाल्याचा आनंद आमच्या ७ जणांच्या टीमने घेतला.

मिमल्यामध्ये मशरूम सेंटरचे मांगले काका पांनी आमची रहाण्याची व्यवस्था मशरूम सेंटरच्या गेस्ट हाउसमध्ये उत्तम प्रकारे केली होती. ५ मार्च ला आम्ही सोलन दर्शन केले. जुलिनी देवीच्या नावावरून या शहराला सोलन में नांव पडले आहे असे मांगले काका यानी आम्हाला सांगितले. प्रत्येक वर्षी मे महिण्याच्या शेवटच्या आठवडयात या देवीची यात्रा असत. त्या निमीत्ताने मे महिन्याच्या शुक्रवार शनिवार आणि रविवार या तिन्ही दिवशी संपूर्ण शहरामध्ये सगळीकडे नाष्टा जेवण तसेच इतर खाण्याचे पदार्थ सर्वांना विना शुल्क दिले जातात.

साेलनमध्ये आम्ही ‘नॅशनल हेरिटेज पार्क आणि पटियाला राजवाडा पाहिला न नल हेरिटेज पार्क ला जाताना घाटवळणाच्या रस्त्यावरून एकदम खाली जावे लागते. या पाकचे मालक मोहन सिक्कीम हे आहेत. या पार्कमध्ये आम्ही ५ मार्चला सकाळी गरमागरम नाष्ट्यावर ताव मारला. या पार्कमधून चारी बाजूला उंच-उंच डोंगर दिसत होते. या पार्क. मध्ये आम्ही तेथील देवीचे अप्रतिम मंदिर पाहिल स्त्रीच्या १५ शृंगारानी युक्त अशा मुल्यां पहिल्या. या पार्कमधील स्वच्छता आणि द-याखो-यातील ते निसर्ग-गदियं आम्हाला परत तेथे येण्यासाठी आमच्या मनाला भुरळ घालत होते. हे पार्क सोलनमध्ये सवात खोल जागी आहे. तर पटियाला राजवाडा सोलनचे सबोत उंच ठिकाणी…या सखोल ठिकाणावरून आम्ही परत घाट-वळणाच्या रस्त्यावरून पटियाला राजवाडा पहाण्यासाठी गेलो.

या घाटवळणाच्या रस्त्यावरून बरती जाताना ऊंच ऊंच अशी सुरूची झाडे. डोंगर-द-या आमच्या …भक्तीदार मधुद्वार श्रीहरीचरणारविंत अक्षरधाम महालय भाग जाहेत अक्षरथाम महा लयाच्या मध्यभागी भगवान स्वामीनारायणांची पंचधातुमिश्रीत स्वर्णमंडीत १२ फुट उंचीची नयनरम्य मुर्ती आहे. त्याचप्रमाणे मंडोवर गजेंद्रपीट संस्कृती बिहार यज्ञपुरुष कुंड आणि संगीतमय फवारे नारायण सरोवर अभिषेक मंडप परिक्रमा योगी हृदम कमळ सांस्कृतिक उद्यान आणि पेमवती आहारगृह आहे. या आहारगृहामध्ये आम्ही दुपारचे जेवण केले. दशद्वार म्हणजे वैदिक शुभकामना प्रतिविवत करणा-या दाही दिशांचे प्रतिक… सम डातील भागस्य दिव्यत्त्व आपल्याकडे प्रवाहित व्हावे आणि आपल्या हृदयातून मंग मय शुभत्वाची निर्मीती व्हावी हा संदेश येथील दशद्वार देत आहेत. भक्तीद्वार म्हणजे परमे विषयीचे विशुध्द प्रेम फुलविणा-या भक्तीचे प्रतिक आहे. सनातन धर्म परंपरेतील भक्त भगवान यांच्या दिव्य भक्तीभावाचे दर्शन घडविणा-या या भक्तीद्वारावरील २०८ युगलाची ‘कलात्मक शिल्प रचना या भक्तीतील आदर्श शामन मुल्यांचा बोध करणारी आहे.

  • मयुरद्वार या स्वागतद्वारावर कलात्मकरित्या साकारलेल्या भव्य तोरणात ८६२ मयुर आनंदनृत्य करित आहेत ते आपल्या स्वागतासाठीच… दोन्ही मयुरद्वाराच्या मध्यभागी भगवान श्री. स्वामीनारायणांची स्मृती जागविणारे श्रीहरीच चरणारविंद….वेत संगमरवरी शिल्पाकृतीतून साकारलेल्या या श्रीहरी चरणारविदावर शंखातून जलधारा अभिषेक – करीत आहेत. अक्षरधाम महालयात गुलावी दगडांत श्वेत संगमरवरी दगडाचे कलात्मक संयोजन करून साकारलेल्या २३४ कलात्मक स्तंभ कलायुक्त घुमटाकार मंड २० चतुष्कोनी शिखर आणि २०००० पेक्षाही अधिक शिल्पाकृती आहेत. या महालाची- ऊंची १४५ फुट आहे. लोखडाचा वापर न करता पाचीन भारतीय स्थापत्य परंपरेला पुन- जिवीत करणारे हे भव्य महालय आहे.

मंडाेवर म्हणजे मंदिर महालयाची वाहवाजु होय ६४ फुट लांब २५ फुट उंच आणि ३२८७ दगडांच्या महायान साकारलेला हा मंडोवर म्हणजे प्राचीन भारतीय महापुरूष ऋषी आचार्य देवता इ. चेपरिश्रमपूर्वक शोधन करून त्याद्वारे ऐतिहासिक २४८ कलमक शिल्पानी मंडोवर सुशोभित केला आहे. २००० फुट लांब असलेल्या गजेंद्रपीठावर अक्षर- चामचे हे भव्य महालय उभे असून त्यासाठी 000 टन आकर्षक दगडांचा आधार घेतला आहे. मुर्तिमंत जीवत वाटणा-या १४८ हत्तींच्या सहाय्याने साकारलेली ही कलात्मक गजेंद्र- पीठाची माला म्हणजे प्राणीसृष्टीच्या संदर्भात अर्पण केलेली विनम्र भावांजली ही…….

  • अक्षरधामाच्या बाहेरील भिंतीवरील भारतीय संस्कृतीतील बेष्ठ ज्योतिर्धर संत-भक्त आचार्य इ. विभूतींची २४८ कलात्मक मुर्ती शिल्प माकारलेली आहेत. नारायण पीठान भगवान स्वामीनारायण यांचा दिव्य चरित्रातील प्रसंगातून साकारलेले १८० फुट लांब कला- त्मक धातुशिल्प आहेत. गजेंद्रपीठात बदलती कलात्मक हत्तीमुद्रा व त्यातुन साकारलेली कथा आहे. अक्षरधामातील नौकाविहार म्हणजे एक अदभूत अनुभव आहे.

या नौकाविहारातून दहाहजार वर्षे पुरातन भारतीय संस्कृतीच्या भव्यतेचे दर्शन आपणास होते सरस्वती नदीच्या उलटावर साकारलेल्या पाचीनतम भारतीय संस्कृतीला येथे ८०० कलमक पुतळ्यांच्या व्याने संशोधन वृत्तीतून प्रत्यक्ष साकार केले आहे. बियातील पहिले विद्यापीठ तक्षशिला आयर्वेद मुलांचे पहिले हास्पिटल नागार्जुनाची रसायन प्रयोगशाळा इ. दृश्याची कलात्मक उभारणी आपल्या डोळ्यापुढे भारताची गौरवशाली परंपरा उसी करतात. यापुरूष कुल प्राचीन भारतीय कुछ परंपरेचा आधार घेऊन लाल दरांनी सुशोभित केले आहे. हे कुल 300 फुट लांब 100 फुट असून भारतातील सर्वात मोठे दर्शयि कुंड आहे. कुडाच्या कलाकार जलकुंड असुन स्थात सृष्टीची उत्पती स्थिती आणि महार या प्रक्रियांचे अदभूत रम्य संगीतमय फवारेद्वारे हृदयगम दर्शन घडविले आहे. जल-ज्योती आणि जीवन यांच्या अदभूत संयोजनाद्वारे निर्माण केलेल्या या आकर्षक व देखण्या कुंडाच्या मोर २७ फुट उंच असलेली बालयोगका मुनील धातुशिल्प उत्कपाची प्रेरणा देते. संगीतकार आक्टोंबर ते मार्च २४५ शुल्क सुरू असतात तर स्वामीनारायण अक्षरधाम प्रत्येक सोमवारी संपूर्ण बंद असते.

वैदिक काळापासून भारतात जल-तिर्थाचा महिमा वंदनिय ठरला आहे. या परंपरेचा स्वीकार करून अक्षरधाम महालयाच्या तिन्ही बाजूनी नारायण सरोवर माकारले आहे. १५१ ती तथा आणि पवित्र मानसरोवर येथील पाण्यांच्या सिंचनाने हे सरोबर पवित्र तीर्थ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. या जलतियांच्या चारही बाजूनी १०८ गोमुन्यातून हे पवित्र पाणी सरोवरात सोडले असून येथील गोमुख म्हणजे भगवताच्या पवित्र १०८ नामा- बलीचे प्रतिक आहे. अक्षरधामच्या चारही बाजूनी पुष्पमाला जोमाची अभी हिमजली परि कुमा लाल दगडातून साकारलेली असून त्यात १५५ चतुष्कोणी १९५२तं आणि १४५ झरोके आहेत. योगी हृदय कम है या मनोहर परिसरात हिरव्यागार गवताच्या मध्य- भागी असलेल एक विशाल अष्टदल कमळ म्हणजे आपल्या पवित्र भावनांचे प्रतिक होय…..

अक्षरधामाच्या दर्शनी भागातील २२ एकर जागेतील भारतीय उपवनांचे प्रतिक अगलेल्या मांस्कृतिक उद्यानातील वृक्ष. पुष्पबेली वनौषधी यांची कलात्मक मांडणी आल्हा- ददायक आहे. या परिसरातील भारतातील महान व्यक्तींचे ८ फुट उंच असलेले ६५ कास्य- शिल्प राष्ट्रीय गौरवाची अनुभूती देतात. तसेच येथे सुर्यप्रकाशातील सात रंगाचे पतिक अम- लेल्या सात अन्यांचा सुर्यरथ आहे. चंद्राच्या १६ कलांचे प्रतिक असलेला १६ हरिणांचा अद- मृत चंद्ररथ आहे. रमणीय असे अक्षरधाम पाहून आम्ही जंतर-मंतर पहाण्यास गेला.

  • जंतर-मंतर म्हणजे जादूटोणा भूत-वाचा असे काही नसून जंतर म्हणजे Instru- ments आणि मंतर म्हणजे Obseration म्हणजेच उपकरणांच्या आधारे केलेले निरी क्षण होय. जंतर-मंतर वरून मराठी दिनदर्शिका इंग्रजी दिनदर्शिका पंचांग कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष वर्षातील सर्वात मोठा दिवस लहान दिवस सुर्य कोणत्या राशीत आहे समान
  • यंत्र समान दिवस इत्यादा रविले जाते. हे सर्व पाहून आम्ही दिल्लीमध्ये पालन एअरपोर्ट जवळील २५५ झिट कंपमध्ये मुक्कामाला गेलो तेथे ऑफिसर मध्ये रात्रीचे जेवण करून विश्रांती घेतली आणि मार्चला सकाळी परत ऑफिसर मेसमध्ये नाष्टा करून दिल्ली दर्शन करण्यास निघालो.

4 मार्चला आम्ही लोटस टैंपल कालीकानी मंदिर इंडिया गेट राष्ट्रपती भवन पाहिले राष्ट्रपती भवनापर्यंत आम्ही राजपथ वरून चालत जाऊन २६ जानेवारी दिवशी होणारे संचलन डोळयासमोर आणले. राष्ट्रपती भवनामध्येसुध्दा आमाला VIP पाम मिळाल्यामुळे राष्ट्रपती भवनाचा आतील सर्व भाग गाईडच्या मदतीने पाण्याचे भाग्य आम्हाला लाभल राष्ट्रपती भवनाच सोय आम्ही एवढ डोळयात माटबल कि तेथील एखादया कार्यक्रमाचा फोटो जरी आज पेपरमध्ये आला तरी आपण आज राष्ट्रपती भवनामध्ये आहोत असा भास होती. राष्ट्रपती भवन पहाण्यासाठी ऑनलाईन बुकिंगची सायसुद्धा आज झालेली आहे. राष्ट्रपती भवनाच्या वास्तुमध्ये सब नक्षीकाम गोलाकार आहे व संपुर्ण इमारत इंग्रजी H आकाराची आहे. राष्ट्रपती भवन ३० एकरमध्ये साकारलेले आहे. तेथे ३४० या आहेत . १५० एकरमध्ये बगीचा साकारला आहे. राष्ट्रपती भवन इ. स. १९२९ मध्ये बांधले आहे. राष्ट्रपती भवनातील सहस्त्र हातांची मुर्ती बैलाची मुर्ती दरबार हॉल अशोका होल लायबरी हे सर्व पाहुन आमच्या डोळयांचे पारणे फिटले दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय पुर- स्कारांचे वितरण केले जाते. तर अशोका हॉलमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम तसेच पुरस्कार दिले जातात. राष्ट्रपतीभवनाचे सौदर्य अप्रतिम आहे. ते २० वर्षाचे असुनसुध्दा आज बांधल्याचा अनुभव येताच राष्ट्रपती भवनातील मोगल गार्डन बघताना डोळयाची पापणीसुद्धा लवत नाही. तेथील हजारो प्रकारच्या औषधी वनौषधी तसेच मन मोहून टाकणारी लाखों प्रकारची फुले पाहून मन आनंदित होते नुगते त्या फुलाकडे पहातच रहावे असे वाटते. तसेच वागतील कामन वेधुन घेतात मोगल गार्डन संपुर्ण वर्षभरामध्ये फक्त २० फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीमध्ये पर्यटकानां वधण्यासाठी खुली असते बाकीचे दिवस बंद असते. तेथील ने अप्रतिम असे गोंदर्य डोळयात साठवून रात्री ५.३० ते 30 या वळे राजीव चौक ते अक्षरधाम अमा मेट्रोचा प्रवास करून रात्रीच्या वेळेतील अक्षरधामची रोषणाई पुन्हा डोळयात साठवून परत अक्षधाम से राजीव चौक असा मेट्रोचा प्रवास करून रात्री पाल- मला २५५ ट्रेझिट कॅपमध्ये मुक्कामी परतलो.

८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता तेथील ऑफीसर मेसमध्ये नाष्टा करून आम्ही त्या ट्रेझिट कंपया निरोप घेतला.८ मार्च रोजी आम्ही राष्ट्रपती भवनासमोरील National War Memorial पाहिले आणि पुन्हा एकदा आमच्यातील देशप्रेम जागे झाले ते राष्ट्रीय स्मारक ती अखंड पेटणारी ज्योत म्हणजे आमच्या देशातील आजपर्यंत ज्या ज्या जवानांनी वलिदान दिले त्या जवानाच्या हुतात्म्याच प्रतिक होय.आणि त्या ज्योतिच्या बाजूला ऊन, वारा पाऊस यांची पर्वा न करता अखंड पहारा करणारा जवान म्हणजे त्या जवानाच वलिदान व्यर्थ न जाऊ देण्याचा निश्चय अशा भावनावश मनानीच आम्ही त्याच्या आठवणीसाठी तेथे थोडीफार खरेदी केली आणि भारतमातेच्या जवानांना श्रद्धांजली वाहून आम्ही दिल्ली शहराचा निरोप घेतला आणि चंडिगडला परत आलो तेथील सेक्टर १९ मध्ये आम्ही थोडीफार खरेदी केली आणि मुक्कामी परत आलो.

सहलीला निघतेवेळी प्रत्येकाच्या मनात पुलवामा हल्ल्याविषयी भिती होती परंतु घरी परत येईपर्यंत त्या हल्ल्याची सावली सुध्दा आमच्या सहलीवर पडली नाही हे सर्व कशा- मुळे शक्य झाले तर आपल्या देशातील जवानामुळे. अशा मौल्यवान जवानांना आमचे पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम सहलीचा अनुभव घेतल्यानंतर प्रत्येकालाच आपण आपल्या मुलांना बरोबर आणलं नाही याची खंत वाटू लागली अशा या अविस्मरणीय सहली बद्दल आमच्या टीम लीडरचे तसेच सहलीतील प्रत्येक सदस्याचे आणि हसतमुखाने उत्साहाने आमचा पाहुणचार व आजारातित्त करणाऱ्या पुजारी कुटुंबियांचे मनःपूर्वक आभार

– राजेंद्र वाडकर, टीम लिडर आणि सर्व सहलीचे सभासद

८ मार्चला रात्री आम्ही आमच्या भाच्याच्या घरी जेवण करून शेवटचा पाहुणचार प्रवासामध्ये दोन दिवसासाठी लागणारी जेवणाची शिदोरी आमच्या सामन्या आणि आनंदित मन वेधुन घेणा-या नातेवाईकांचा निरोप या सहलीची आठवण म्हणून त्यांनी महलीतील प्रत्येक व्यक्तीला दिलेली भेटवस्तु तसेच पुन्हा एकदा झालेली मामा भाच्याची गळाभेट पाहून पत्त्येकाचे दाटून आलेले कंठ हे मंगळ बरोबर घेऊन आम्ही परत आमच्या मुक्कानी परत आमच्या मुक्कामी विश्रांतीगृहाकडे आला तेथे दोन नाम विश्रांती घेतली. रात्री २.३० ला आम्हा सगळ्यानां मोडण्यासाठी चहासह भाव्याची तयार होऊन आलेली फौज पाहून प्रत्येकालाच पुन्हा एकदा गहिवरून आले. जिप्सी गाड्यामधून पुन्हा आम्ही रात्री ३ वाजता चंदिगड रेल्वेस्टेशनवर पोहचलो आणि ९ मार्चच्या पहाटे ३.२० ला आम्ही त्या स्वच्छ आणि सुंदर शहराचा निरोप घेतला.

परत आमचा ४० तासांचा प्रवास सुरू झाला येताना प्रत्येकजण उत्साही होता. परंतु १०- दिवसाच्या प्रवासाने सगळयानाच आता कंटाळा आला होता. परतीच्या प्रवासामध्ये परत पत्त्याचा ‘जजमेंट चा डाव मांडला तरीसुध्दा आता तो ४० तासांचा परतीचा प्रवास काह संपता संपत नव्हता. अशा कंटाळलेल्या आमच्या मनाला आनंदित ठेवण्याचे काम काही वैयक्तिक अडचणीमुळे आमच्या सोबत येऊ न शकलेल्या मौ जयश्री गिलबिले वहिनिनी केल. ४० तासांच्या प्रवासामध्ये गिलबिले वहिनिनी फोनवरून आपल्या विनोदी भाषण- शैलीने आमचे मनसोक्त मनोरंजन केले. फोनवरून त्या बोलत होत्या आणि आम्ही पोट दुखेपर्यंत हसत होतो त्यांनी आम्हाला एवढे हसवले कि आमचा ४० तासांचा प्रवास कधी संपला कळालेच नाही. १० मार्चला संध्याकाळी ६.३० वाजता आम्ही मिरजेला पोहचलो व तेथुन ९.०० वाजता कोल्हापुरात आणि रात्री 10.00 वाजता प्रत्त्येकजण आपआपल्या घरी पोहचलो.

 

लेखक राजेंद्र वाडकर, कोल्हापूर
एक प्रासंगिक आठवण
2019 च्या सहलीची

 

आपल्या आठवणी, नवनवीन प्रसंग.. प्रासंगिक, छंद, परिसरातील आगळीवेगळी माहिती असेल तर नक्कीच POSITIVVE WATCH व्यापपिठावर संधी देऊ पब्लिश करू

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.