(शब्दांकन जी.जी.पाटील )
निसर्ग सौंदर्याची मुक्त हस्ताने उधळण झालेल्या शाहूवाडीतील आंबा परीसरातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी वर्षभर सर्व ऋतूत पर्वणीच असतात. शाहूवाडीच्या ह्या सौंदर्य खाणीतील आणखी एक साज म्हणजे—.निसर्ग संपन्न पालेश्वर धरण.धरणाच्या परिसरातील निसर्ग सौंदर्याचा मन मुराद आनंद लुटण्यासाठी,येथील हा देखणा निसर्ग अविष्कार मनाच्या कप्यात साठवण्यासाठी ….पर्यटकांची पावले आपसुकच पालेश्वर धरणाकडे वळतात.
मलकापुर पासून साधारणतः ८–९ कि मी.अंतरावर, मलकापूर—येळवण जुगाई रोड वर…पांढरे पाणी..शौर्य पीठ पावनखिंड कडे जाताना माण गावापासून थोड पुढे गेल की ठाणेवाडी फाटा लागतो…फाट्यापासून तलाव साधारणतः १ कि.मीअंतरावर आहे.पालेश्वर तलावाच सौंदर्य साज काय येगळाच आहे,पक्ष्यांचा किलबिलाट,हिरवा गर्द निसर्ग जंगल आणि वन्य प्राण्यांचा सहवास परीसरात असणारी शेती आणि गावगाड्यातली ग्राम संस्कृती सर्व प्रकारचा रानमेवा यांमुळे तलावाचे सौंदर्य आणखी खुलते.झोंबणारा वारा आणि इथला एकांत मनाला सुखावतो.गव्याचे दर्शन तर नक्कीच.
विविध पक्ष्यांचा कानावर पडणारा आवाज मनाला वेगळाच आनंद देतो.पावसाळ्यात तर येथिल सौंदर्य आणखी खुलते.पाण्याच्या प्रवाहावर असलेल्या धबधब्याचे सौंदर्य तर नाद खुळाच असते.या ठिकाणी पाच बोटिंगची सुविधा झाल्याने पर्यटकांची येथे नेहमीच वर्दळ असते.येथील नयनमनोहर वातावरणात बोटिंग करण्याचा आनंद काय औरच. येथे मागणी नुसार अस्सल गावराण-शाहूवाडी पद्धतीचे शाकाहारी-मांसाहरी जेवण मिळते. मावळतीला जाणारा सुर्य येथे पाहणे म्हणजे एक डोळ्याचे पारणे फेडणारा नजाराच.अशाच एका मावळतीला…..पालेश्वर तलावाच सौंदर्य पाहण्यासाठी,निसर्गाने केलेली मुक्त हस्ताने निसर्ग सौंदर्याची उधळण अनुभवण्यासाठी,गावगाड्यातली ग्राम संस्कृती अनुभवण्यासाठी पालेश्वर धरण परिसरास नक्की भेट द्या.
लेखक- डॉ.झुंझार माने
स्वराज्य प्रतिष्ठाण
९८८१९८१०७३
युगंधर फिल्म प्रोडक्शन
शाहूवाडी.
POSITIVVE WATCH मध्ये वाचा लेखक डाँ. झुंझार माने यांची शाहुवाडीचे साैंदर्य ही मालिका
दर रविवारी हाेणार पब्लिश