बिबट्याच्या हल्ल्यात जखमी श्रेयस यास सव्वा लाखाची मदत
शिराळा प्रतिनिधी (जी.जी.पाटील)
उखळू ता . शाहूवाडी येथे इयत्ता ४ थी मध्ये शिकणाऱ्या श्रेयश प्रकाश वडाम (वय वर्ष ९ )या शाळकरी मुलावर बिबट्याने २० आक्टोंबर ला प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले होते.त्याला तातडीची मदत पंचवीस हजार दिली होती.उर्वरित एक लाख रूपयाची मदतीचा चेक नुकताच त्याला सुपूर्त केला.चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे याच्या हस्ते चेक देण्यात आला यावेळेस श्रेयस वडाम, त्याचे आईवडील, वनपाल शिवाजी पाटील, हारून गारदी,वनरक्षक उस्मान मुल्ला व स्टाफ उपस्थित होते.
२० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा च्या सुमारास उखळू गावातील श्रेयस प्रकाश वडाम हा शाळकरी मुलगा घराच्या पाठीमागे पाण्याच्या टाकीजवळ शौचालयास गेला असता या हिंस्त्र वन्य प्राण्याने त्याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यामध्ये त्याच्या डोक्याला, कानाला, पाठीवर, मांडीवर, अशा संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा कडून तातडीची मदत पंचवीस हजार त्यावेळेस देण्यात आली होती.उर्वरित एक लाख रूपये चा चेक नुकताच श्रेयस वडाम व त्याचे आईवडील यांच्याकडे चांदोलीचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यानी सुपूर्त केला.
फोटो – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा चे वतीने श्रेयस वडाम याला मदतीचा धनादेश देताना वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे व अन्य