(शब्दांकन जी.जी.पाटील )
रांगड्या शाहूवाडीतला निसर्ग सौंदर्याचा रांगडा अविष्कार पावसाळ्यात तर येवढा नयनमनोहर असतो की दृष्ट लागावी.अंगावर धावूण येणारे धबधबे ,विविध जैवविविधता,ऐतिहासिक वारसा,कडेकपारी व धार्मिक वारसा यांमुळे शाहूवाडीचा साज काय येगळाच.
ह्याच माळेतील अविष्कार म्हणजे निनाई परळे धरण परीसर.मलकापूर-आंबा रोड वर निळे गावापासून थोडे पुढे गेले की करुंगळे फाट्यावरुन आत करुंगळे-आळतूर-पुसार्ले-भेंडवडे -निनाई परळे धरण लागते.फाट्यापासून साधारणपणे १० कि.मी.अंतरावर हे धरण आहे.धरणाचा परीसर वनराईने वेढला असून विविध पशू -पक्षी व जैव विविधता बघावयास मिळते.
येथून पुढे जंगलातील रस्ता उदगिरीला जातो.निरव शांतता ,झोंबाणारा वारा, मुसळधार पाऊस आणि येथील,हे नयनमनोहर वातावरण म्हणजे डोळ्याचे पारणे फेडाणारा नजाराच. धरणाच्या डाव्या बाजूस पेढे डाग आहे.येथून पुढे निसर्गमय वातावरणात डोंगरकाठचा हनुमान आहे. हा निसर्गाचा अविष्कार पाहण्यासाठी हवे निसर्ग वेडे पण पावसात भिजण्याची हौस व आवश्यकता असेल तिथे रानवाटातून कितीही चालायची तयारी असायला हवी. धन्य आमुच्या कडेकपारी.
कडवी मध्यम प्रकल्पाचे हे धरण २३.३२चौ.कि.मी.असून धरणाची लांबी १४९९ मी.आहे.मातीचे धरण प्रकारातील हे धरण असून शेतीसाठी वरदान ठरले आहे.येथे विद्युत निर्मिती केंद्र सुद्धा आहे. धरणाचा पोटफुगी नाला-कडवी नदीची उप नदी हे पाण्याचे स्त्रोत आहे.धरणाची म.उंची ३६.०५ मि. आहे. पावसाचा जोर,वाढला की धरण पुर्ण भरते,सांडव्यावरुन पाणी वाहू लागते.
धरणाचा back water परीसर म्हणजे स्वर्ग सुखाच्या संकल्पना खुज्या करणारा नजाराच.येथून दिसणारा सुर्यास्त डोळे दिपून टाकतो.पक्ष्यांचा आवाज,निरव शांतता,सुर्यास्त वेळी चमकत्या सोनेरी लाटा ,उदगिरी डोंगराचा परिसर,समोर दिसणारी विविध जैव विविधता नाद खुळाच. एका निरव सायंकाळी हा निसर्गाचा साज अनुभवण्यासाठी…..आमच्या निनाई परळे धरण परिसरास नक्कीच भेट द्या.काही अडचण किंवा अधिक माहीतीसाठी संपर्क करु शकता.आमच्या रांगड्या मातीतला हा रांगडा नजारा पाहू शकता.
याआधीचा भाग वाचण्यासाठी खालील निळ्या लिंकवर क्लिक करा. म्हणजे भाग एक तुम्हाला वाचता येईल.
डॉ.झुंझार माने
स्वराज्य प्रतिष्ठान-युगंधर फिल्म प्रोडक्शन.
९८८१९८१०७३
आपल्या प्रतिक्रीया नक्की आमच्या कमेंट बाँक्समध्ये कळवा.. अशा सुंदर लेखणासाठी POSITIVVE WATCH डीजीटल मिडीयाचे व्यासपिठ खुले राहील.