शासकीय शालेय राज्यस्तरीय तायक्वान्डो स्पर्धेत शिराळा तालुक्यातील चरण येथील राजवर्धन अरुण रेळेकर याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला
शिराळा ( जी.जी.पाटील)
चरण ता. शिराळा येथील राजवर्धन अरुण रेळेकर याने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे आयोजित केलेल्या शासकीय शालेय राज्यस्तरीय तायक्वान्डो स्पर्धेत ५९ कि. वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. त्याची *शालेय राष्ट्रीय तायक्वान्डो स्पर्धेसाठी* निवड झाली आहे. तॊ सध्या ज्ञानदीप इंटर नॅशनल स्कूल, इस्लामपूर येथे इयत्ता ९ वी त शिकत आहे.
त्याला जिल्हा तायक्वान्डो असोसिएशन चे महासचिव सुरेश चौधरी, मुख्य प्रशिक्षक सुनील खिलारे, शिराळा तालुका तायक्वान्डो असोसिएशन चे अध्यक्ष अरुण रेळेकर, यांचे मार्गदर्शन लाभले. राजवर्धन च्या या यशाबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.