चांदोली परीसरात बिबटयांचा हैदोस
आठवडयाभरात बिबटयाने चार शेळया ठार मारल्या.
ग्रामस्थांतुन भितीचे वातावरण पसरले आहे
शिराळा (जी.जी.पाटील)
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील मिरुखेवाडी व मराठेवाडी येथील शेळ्यावर बिबटयाने हल्ला करुन ठार मारल्याच्या घटना घडल्या आहेत.गेल्या आठवडया भरातील ही चौथी घटना आहे.
मिरुखेवाडी ता.शिराळा येथील किसन धोंडीबा मिरुखे यांच्या मालकी हक्काच्या मिरुखेमाळ म्हणुन संबोधल्या जाणाऱ्या शेतीमध्ये बिबटयाने शेळीवर हल्ला करुन शेळीला ठार केले.तर मारुती पांडुरंग मिरुखे हे आपल्या वाघीन दरा म्हणुन संबोधल्या जाणाऱ्या शेतीमध्ये शेळया चारावयास नेल्या असता बिबटयाने शेळीवर झडप घालुन शेळीला ठार मारले.तानाजी किसन वरपे हे भटटीचा माळ म्हणुन संबोधल्या जाणाऱ्या शेतामध्ये शेळया चारावयास नेल्या असता बिबटयाने शेळीवर हल्ला करुन शेळीला ठार मारले.या घटना ताज्या असताना रविवारी ता.१९ रोजी मराठेवाडी येथील बाळासो रामचंद्र मराठे याच्या राहत्या घरात पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास बिबटयाने घरात घुसुन गाभण शेळीवर हल्ला करुन तिला ठार मारले.
बिबट्याचा हैदोस या परिसरात सुरूच आहे.वनविभाग मात्र मुग गिळून गप्प आहेत. वारंवार होणाऱ्या बिबटयाच्या हल्ल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.बिबटयाचा बंदोबस्त करावा.अशी मागणी ग्रामस्थातुन होत आहे.
फोटो – चांदोली परिसरातील बिबट्याचे संग्रहित छायाचित्र.