उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर आयएसी अध्यक्षांची टीका
मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षासंदर्भात ऐतिहासिक निकाल दिला आहे.या निकालानंतर पक्षातील ठाकरे घराण्याची घराणेशाही, वर्चस्व मोडीस निघाले आहे.केवळ भाषण, आरोप-प्रत्यारोप आणि भावनिक आवाहन करून पक्ष चालत नाही. नेतृत्व करण्याची क्षमता, संघटन कौशल्य आणि विशेष म्हणजे पक्षाचा विश्वास नेतृत्वावर असणे आवश्यक आहे, असा टोला इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना शनिवारी लगावला.
कमकुवत नेतृत्व आणि भ्रष्टाचार यामुळे कशाप्रकारे पक्षाची वाताहात होते याचे उत्तम उदाहरण ‘शिवसेना’ ठरली आहे.स्व.बाळासाहेब ठाकरेंनी ज्या मेहनतीने शिवसेना वाढवली, जनतेमध्ये विश्वास निर्माण केला, जनसामान्यांच्या प्रश्नांचा वाचा फोडून घरोघरी एक विशिष्ट स्थान निर्माण केले होते, ते त्यांचा मुलगा आणि नातवाने गमावले. पक्षही गेला आणि जनतेमधील विश्वास तर आधीच उद्धव यांनी गमावला आहे. अशात त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा, असे आवाहन हेमंत पाटील यांनी केले.
ठाकरे गटाने सहा खासदारांचा पाठिंबा असल्याचे आयोगाला सांगितले.प्रत्यक्षात चार खासदारांनीच ठाकरेंना पाठिंबा देणारे प्रतिज्ञापत्र सादर केले होते.खासदारांच्या संख्याबळाचा विचार करता,शिवसेनेला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण १ कोटी २ लाख ४५ हजार १४३ मते मिळाली. खासदारांच्या पाठिंब्यानुसार शिंदे गटाकडे ७४ लाख ८८ हजार ६३४ मतांचा पाठिंबा असल्याचा निष्कर्ष आयोगाने काढला.
शिवसेना बळकावली असा टाहो फोडत उद्धव ठाकरे यांनी जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. पंरतु, खरा पक्ष तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यासोबतच उभा राहीला.शिवसेनेच्या फुटीचा वाद निवडणूक आयोगात पोहचल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे १३ तर ठाकरे यांच्याकडे पाच खासदार होते.