तुम्हांला तर माहीतच आहे शाहूवाडी कोकणचे प्रवेशद्वार,२० हजार पेक्षा जास्त हेक्टर परीसरावर पसरलेला जंगली भाग हाच पर्यटनाचा मुख्य घटक.
ह्या वाटेचा थाट काय औरच,वेडीवाकडी वळणे,पावसात मातीचा सुटलेला गंध-डोळ्याचे पारणे फेडणारे मानोली धरण-खवय्यांची खवय्येगिरी पुरवणारी येथली सर्व रेस्टॉरंट -मानोली गणपती मंदीर.एक वेगळीच उर्जा व मनमुराद भटकंतीचा आनंद देणारा हा मार्ग.
आणी येथला पाऊस कसा….चिंब चींब भिजवणारा,कडे कपारींशी हितगुज करणारा,शौर्य वाटेवर-शौर्याच्या पावसात अंगात वीरश्री संचारणारा ,गवताच्या पात्यांवर दवबिंदु मधुन दिसणारा,नागमोडी वाटेवर-ओला चींब भिजवणारा,जोरदार सरीं मधून आग्या मव्हांसारखा आंगाला टोचणारा, रिमझीम सरी आणी वाफळलेला चहा नाद खुळाच.
आणी येथला पाऊस कसा….
चिंब चींब भिजवणारा,कडे कपारींशी हितगुज करणारा,शौर्य वाटेवर-शौर्याच्या पावसात अंगात वीरश्री संचारणारा ,गवताच्या पात्यांवर दवबिंदु मधुन दिसणारा,नागमोडी वाटेवर-ओला चींब भिजवणारा,जोरदार सरीं मधून आग्या मव्हांसारखा आंगाला टोचणारा, रिमझीम सरी आणी वाफळलेला चहा नाद खुळाच.
धोपेश्वर नयनरम्य परिसर शाहुवाडीच रांगड सौंदर्य |
पुन्हा भेटू असच भटकंती मध्ये…….
रांगड्या मातीत….रांगड्या शाहूवाडीत
डॉ.झुंझार माने
स्वराज्य प्रतिष्ठान
युगंधर फिल्म प्रोडक्शन
शाहूवाडी
आज मी तुम्हांला अशाच एका भटकंती वाटेवरुन फिरवून आणतो.मलकापूर पासून उचत-माण ते चवथा मैल ते पांढरेपाणी-पावनखिंड-भाततळी-केंबुर्णेवाडी-वाघझरा-आंबा मार्ग म्हणजे रोमहर्षक इतिहास व निसर्गाच्या नयनमनोहर देखाव्याच दर्शन घडाविणारा मार्ग.चवथा मैलपासुनच सुरु होते गर्द हिरवीगार झाडी,झोंबाणारा वारा,माण पासून थोडे पुढे ऊजवीकडे ठाणेवाडी फाट्यावरुन आत नजरेस येणारे ,सौंदर्याचा साज -पालेश्वर धरण. चवथा मैल पासून दिसणाऱ्या हिरव्या गार कडे कपारी-येथुन वरती असलेल्या माण धनगरवाडा येथूनच छत्रपती शिवरायांच्या व वीरधुरंधर मावळ्यांच्या पद स्पर्शाने पावन झालेली शौर्य वाट आहे.पन्हाळा-पावनखिंड मोहीम याच शौर्य वाटेवरुन आयोजित केल्या जातात.नागमोडी वळणे,डोंगार दरी झोंबणारा वारा आणी रिमझीम पावसातून येथला प्रवास,म्हणजे एक वेगळीच अनुभुती. |
पावनखिंड दर्शनानंरत,भाततळी मार्गे केंबुर्णेवाडी ते विशाळगड व आंबा जाणारा मार्ग म्हणजे निसर्ग सौंदर्याची खाणच.येथे निसर्गाने मुक्त हस्ताने निसर्ग सौंदर्याची उधळण केली आहे.नागमोडी विविध जैव विविधतेने व ग्रामीण जीवनाने नटलेली घाट वाट तीचा थाट काय येगळाच.डोंगरावर जणु नभ उतरलेत असा भास होतो.विविध पक्षी,शेतीवाडी यांमुळे सौंदर्य खुलुन येते.भाततळी मधून गेळवडे धरणाकडे जाता येते. |