एका गावाच्या चौकातून येत असतांना, तीन बाजूंना फुटलेल्या रस्त्यांच्या मधील चौकात असणाऱ्या अण्णाभाऊ साठेंच्या पुतल्याकडे लक्ष गेले. गाडी थांबवली आणि पुतळा पाहू लागलो.पहाता पहाता पुतळ्याच्या मागील बाजूला वाढलेल्या प्रचंड अशा पर्जन्यवृक्षाकडे लक्ष गेले. त्याने आपला विस्तार असा काही पसरवला होता की, जणू अण्णाभाऊंच्या डोक्यावर मोठाले छत्रच उभा राहिले आहे. असे वाटावे.वसंत ऋतू म्हणजे रंगांची उधळण. अनेक वृक्ष वेगवेगळ्या रंगांच्या फुलांचा पसारा आपल्या अंगावर घेऊन या ऋतूत फुलत असतात. एका बाजूला प्रचंड उष्णतेने हैराण झालेल्या जीवसृष्टीला, या रंगांमुळे थोडासा का होईना पण दिलासा मिळतो. फुलांचा सहाय्याने या पर्जन्य वृक्षाने केलेला शृंगार खूपच सुंदर दिसत होता.
आवडीने पाहिल्यास निसर्ग व फुलं सुंदर दिसतात.. मिलींद यादव यांच्या नजरेतून हा नजारा
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.