कात्यायनीच्या मागील रस्त्याने जाता जाता बाजूला वाळलेल्या गवतांच्या गदारोळात केशरी रंगाच्या फुलांनी लक्ष वेधले.
निसर्गाची एक किमया आहे. लहान बाळ. मग ते कोणाचेही असोत. माणसाची, प्राण्यांची वा वनस्पतींची. ती निरागस, गोंडस दिसतात. लाल-केशरी रंगांची ही उधळण त्यांच्या जवळ गेल्याशिवाय अनुभवता येत नाही. ज्या नाजूकशा फांद्यांवर ही फुलं बागडत असतात त्या संपूर्ण झाडावर एकही पण नजरेस पडणार नाही. जवळ गेलो तर स्वागत करतील ती ही फुलच.
‘ पांगारा ‘ फुलला की, पाहणाऱ्याला एक तर कुस्तीची दंगल आठवावी नाहीतर चिखलगुठा. या साऱ्यांची रंगसंगती एकसारखीच. हाताच्या तळव्यावर बसतील इतका एका गुच्छाचा पसारा. समईतील पेटलेल्या वाती जशा दिसतील. तसा यांचा अवतार.
रंगामुळे आणि मधामुळे भुंगे, पक्षी यांच्याकडे आकर्षित झाले नाहीत तरच नवल. या मोसमात पांगारा एकदा तरी जवळून अनुभवावा.
सुंदरता निसर्गांची.. आकर्षण फुलांचे- मिलींद यादव यांच्याच नजरेतून आकर्षक छायाचित्र पहा
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.